पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १७७ १ पीक लहान असेपर्यंत किंवा त्याची वाढ बंद पडली असतां त्याची झाडें गुरांना मुळीच चारूं नयेत. २ ते वाढीवर असतांना चारावयाचे झाल्यास ती उन्हांत दोन दिवस पडूं द्यावी. त्यांत चांगला कोरडेपणा आल्यावर ती चारावी. ३ कच्चा कडबा त्याला फूल आल्यावर चारण्यायोग्य होतो. वरील लहान, कच्चा कडबा कृतीने सांठवून ठेवून उपयोगांत आणितां येतो. कडब्याची ताटें-कणीस काढून घेतल्यावर ताटें हिरवी आहेत तोंच कापून चार-चार, सहा-सहा पेंढ्यांचे ढीग शेतांत उभे करून ठेवितात. ताटें ऊन आणि वारा यांनी हडकून कोरडी झाली ह्मणजे सावलीत त्यांचा साठा करून ठेवावा. ती घरावर किंवा अंगणांत खुली टाकू नयेत. उन्हाने आणि पावसाने ती खराब झाली असतां गुरें खात नाहीत. चरी--केव्हां ज्वारी किंवा बाजरीचे पीक वैरणीकरितांच करीत असतात. त्यासही वरील नियम लागू आहेत. ह्या पिकापासून दाणा घेण्याची अपेक्षा नसते ह्मणून त्याचे बी दाट पेरितात; आणि झाडे फुलास येतांच कापून घेतात. _भूस (भुसा किंवा भुशी)-तांदुळ, गहूं, जब इ० एकदल धान्यांचे झाडांतून, दाणा काढून, घेतल्यावर जो भाग रहातो, त्यास भुसा आणि द्विदल धान्यांच्या (डाळींच्या ), टरफलांला भुशी ह्मणतात. एकदल धान्यांच्या कोंड्याचाही भुशीत समावेश होतो. ( भसा आणि कोंडा यांतील फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे ). १ तांदुळाच्या भुशाला ' पेंढा' असें एक विशेष नांव आहे. १२