पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ घरांतली कामें. गोठ्यांत दुर्गंधि राहूं देऊ नये. संध्याकाळ झाल्यावर त्यांत एकादें लाकूड, गवताचा उरलेला भाग, झाडांची वाळलेली व गळून पडलेली पाने, गवऱ्या, राळ, गुगुळ, किंवा ऊद यांचा धूर करावा. चुन्याचे, फेनाइलचे किंवा कार्बोलिक अॅसिडचे पाणी (१:४०) शिंपडल्यानेही दुर्गंधि नाहीशी होते. वर्षांतून एक दोन वेळां ( वसुबारस, गोवर्धन-उत्सव वगैरेला ) भिंतीची लिंपाई पोताई करावी. गोचिड, गोमाशा, गांधिलमाशा वगैरे प्राणी दुर्गंधीमुळे गोठ्यांत येतात आणि तेथें घाणीच्या आश्रयाने वस्ती करून गुरांना त्रास देतात. हे सांसार्गक रोग पसरीत असतात. ह्मणून गोठ्याच्या सफाईकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पातळ, घाणेरडे आणि रोगग्रस्त जनावराचे शेणमूत असेल त्याची लागलीच विल्हेवाट लावावी. तें वस्तीपासून लांब जमिनीत पुरण्यास किंवा जाळण्यास पाठवावें. निरोगी गुरांचे शेणमूत एकत्र मळून त्याच्या गवय करून एका नियमित जागेत वाळवाव्या. रहात्या घरांतल्या परसांच्या भिंतीवर, शेतखान्याजवळ किंवा विहिरीजवळ गवया कधीही थापूं नयेत. सवड असल्यास गवऱ्या न करतां शेणमुताचे खत तयार करून ते उपयोगास आणावे किंवा ती कोणा खत करणारास रोजचे रोज काढून नेण्याचा मक्ता द्यावा. शेजारीपाजारी शेण घेण्यास येतात त्याशी वाद घालू नये. कारण शेणाची मोठीशी बाबत नाही. तरी सगळे शेण हातोहाती उठून जाऊं देऊ नये, आणि ते नेणाराने शेणचे शेण नेऊन आणखी उपद्रव करूं नये यावर लक्ष ठेवण्याची उपाधि आपले मागे लावून घेऊ नये. खत करणे-शेणमूत आणि त्यांचे खत भुईवर उघड्या जागेत जमविलें तर तें कामास येत नाही. तें एकादी खाच करून त्यांत