पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १७१ ५ गोठ्याचा मागील दरवाजा फाटकाचा करावा, निदान त्यास बांबूची जाळीदार तट्टी तरी लावावी. दरवाजा बंद करणे जसे चांगले नाही, तसाच तो खुला ठेवणेही योग्य नाही. बंद करणे जनावराचे आरोग्याला अपायकारक आहे आणि खुला ठेवल्यापासून गुरूं एकादे वेळी दावें तोडून बाहेर पडल्यास बागेला अपायकारक आहे. ६ त्यांत पावसाची ओसारी किंवा सूर्याचे ऊन गुरांचे अंगावर माऊं नये. h d - ७ गोठ्याची जमीन मुरमी किंवा फरसबंदी केलेली असावी. फरस दगडी असूं नयेत. जमीन मागील भागाला अंमळ उतरती असावी. तिच्या खाली सबंध लांबीत एक मोरी करावी. ती उथळ असावी. गोठ्यांत स्वच्छता राखावी. दुभते जनावर सतत घरी रहात असले तर दिवसांतून दोन तीन वेळां आणि निजण्यापूर्वी एक वेळ मजबूत खराट्याने गोठा झाडून स्वच्छ करावा. शेण गोळा करून गोठ्यांतच न ठेवितां कांही अंतरावर नियमित जागेत ठेवावें. शेणामुतांत भरलेला. चाराही शेणाबरोबर काढून टाकावा. मूत्र मोरीतून वाहून मोठ्या गटारांत पडत नसेल तर ते एकत्र गोळा होण्यासाठी मोरीच्या खाली एका बाजूला चुनेगच्चीचा एक खड्डा करावा आणि त्यांतून सांचलेलें मूत्र बालटीने भरून [खत केले असल्यास त्यांत ] टाकावें. गोठ्यांत ओल राहू देऊ नये. विशेषत: पावसाळ्यांत याबद्दल ज्यास्त खबरदारी घेतली पाहिजे. ज़मीन फरसबंदीची असल्यास पाण्याने धुवावी. ती मुरमी किंवा मातीची असल्यास तींत गोमूत्र शिरून ती भिजते. तेवढा भाग फावड्याने खरडून काढून त्यावर दसरी बारीक माती किंवा राख पसरावी, आणि खरडून काढलेली राखमाती [ खत जमविले असल्यास त्यांत ] टाकून द्यावी.