पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. १७३ vvvvvvvvvvvvvvvv जमविण्याची जरूरी असते. बाग किंवा शेत असल्यास त्यांच्या एका कोपऱ्यांत अशी खाच करता येते. एरव्ही ती लोकवस्तीचे भागांत करण्याची सोय नसते. लहान लहान गांवांत वस्तीचे बाहेर खाच करून तेथल्यातेथे शेणमुतारी पोहचविणे कांही कठीण नसते. खताची खाच-खताची खाच जरूरीप्रमाणे पांच सहा फूट लांबरुंद आणि तितकीच खोल करून ती चुना-विटांनी तळाला आणि सभोंवतीं बांधून काढावी. वर टिनाचे छप्पर असें घालावें की त्यापासून पावसाचे पाणी किंवा ऊन खाचेत जाण्यास पूर्ण प्रतिबंध व्हावा. ह्या खाचेत शेणमूत टाकीत जावें.घरांतील राख व झाडणही त्यांत घालावी. खाचेच्या तोंडावर लाकडी फळ्या घालाव्या किंवा लांकडे आणि गवत, पाने वगैरेचे आच्छादन करावें.हे शेणमूत नेहमी. ओलें राहून सडले पाहिजे. तें सुकल्यासारखे दिसले तर पाणी शिंपडून ओले करावें. फार पातळ दिसले तर दांड्याने वर खाली करावें, ह्मणजे त्यांत हवेचा प्रवेश होऊन ती फुगेल. त्यांतून उद्दाम घाण येऊ लागली असतां त्याला दांड्याने उकरून थोडे पाणी शिंपडावें. खाच भरली ह्मणजे ३।४ आठवडे तशीच राहू देऊन मग तें खत कामास आणावें. खाचेतेले बाहेर निघून ती रिकामी होईपर्यंत थोडे दिवस सांठवणीकरितां दुसरी एक लहान खाच करावी. ही आंतून चुनाविटांनी पक्की केली नाही तरी चालेल. खाचेतले खत काढतांना त्याबरोबर तळाची आणि सभोवतालची थोडथोडी मातीही काढून घ्यावी. ह्मणजे खतांतले रस जवळच्या मातीने शोषून घेतलेले असतात ते वायां जाणार नाहीत. - दुमत जनावराची स्वच्छता-गाईला स्वभावतःच स्वच्छता आवडते. ह्मणून तिला निर्मळ राखावी. त्यासाठी तिला रोज स्नान