पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० घरांतली कामें. marnamannawwarrammmmmrammarwar बांधिले आणि कसला तरी चारापाणी दिले झणजे त्याचेसंबंधी आपले कर्तव्य झाले असे कधीही समजतां कामा नये. या . गोठा-गुरांचा गोठा मनुष्याच्या रहात्या जागेपासून दूर असावा. तो मोठा वाडा असेल, तर त्यांतल्या मागील बाजूस किंवा त्यास चौक असल्यास दुसऱ्या चौकांत करण्यास हरकत नाही. कारण, गुरांच्या नाकातोंडातून श्वासोच्छासाबरोबर जी हवा निघते, ती फार विषारी असते. ती शेजारच्या हवेला दूषित करते. शिवाय सांसर्गिक रोग वाहणारे सूक्ष्म कीटक या गुरांचे अंगावर आणि गोठ्यांत असले तर ते त्यांचे जवळ राहणारांत तो रोग फार त्वरेने पोहोंचवितात. ह्मणून गोठ्याजवळ मनुष्यांनी राहणे आरोग्यदृष्टया इष्ट नाही. गोठ्यासंबंधाने पुढील गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत १ गोठा प्रशस्त असावा. इतका की, त्यांत गाईला दोन वासरांसहित ठेवता यावे. गोठ्याची उंची १०।१२ फूट आणि प्रत्येक गुराला जागा ८ फूट लांब व तितकीच रुंद असली पाहिजे. दोन गुरांमध्ये अंतर एका गुराला आपल्या अवयवाचा स्पर्श कोणचेही प्रकारे दुसऱ्या गुराला करता येणार नाही इतकें राहिले पाहिजे. गोठ्यांत वरचे बाजूला माळा करूं नये किंवा इकडे तिकडे काही अडगळ-लांकडे, गवऱ्या वगैरे ठेवू नयेत. त्याच्या भिंती स्वच्छ असाव्या. २ तो कोंदट, अंधेरांत, दमट, किंवा लोण्याच्या मातीचा नसावा. . ३ त्याचे आंत दिवसांतून केव्हां तरी सूर्याचे किरण येत असले पाहिजेत. ४ त्यांत वाऱ्याचा संचार समोरासमोर दोन दिशांनी झाला पाहिजे, पण तो गुरांच्या अंगावरून होऊ नये. त्याकरितां दरवाजे, खिडक्या, गवाक्षे इ० गोठ्यांला असावी. मा