पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें. ही मनाला आकर्षण करणारी आहेत; आणि ह्यामुळेच गाय सर्व जगाला संग्राह्य झाली आहे. अॅस-मशीमध्ये दूध अधिक प्रमाणाने आणि अधिक स्नेहयुक्त देण्याशिवाय दुसरे गुण कांहींच नाहीत. उलट तिच्या दुधांत दुर्गुण बरेच आहेत. तें रोग्याच्या, तान्ह्याच्या आणि वाढल्या मुलाच्या उपयोगास येत नाही. शिवाय मशीचे अवजड शरीर आणि अंमगल राहाणी ह्यामुळेही ती लोकांना फारशी आवडत नाही. बहुधा धंदे. वाईक आणि ज्यांना दुधातुपाकरितांच दुभते जनावर पाहिजे असते असे लोक हँस बाळगतात. 1 बकरीच्या आणि इतर दुभत्याचा विचार आपल्याला फारसा महत्वाचा नसल्यामुळे, येथे करीत नाही. - दूधदुभत्याच्या कामाची माहिती-दूधदुभत्याचे काम कांहीं फार नाही, थोडें आहे. पण ते शिकल्या केल्याशिवाय नीट करतां येत नाही. त्याची माहिती करून घ्यावी लागते. ती सर्व एकेकाळी एकेजागी हवी तेव्हां मिळत नाही. ह्मणून ती ठोकळमानाने येथे दिली आहे. तिचा उपयोग करून घ्यावा. ह्या विषयांत जी नवीन पुस्तकें किंवा मासिकें निघतात, त्यांतलें एकादें वाचीत जावें ह्मणजे अगदी चालू काळापर्यंतचे ज्ञान आपल्यास होते, आणि उत्तरोत्तर सुधारणा करता येते. गोठ्याची व्यवस्था-दुभत्या जनावरासंबंधाने एक मुख्य आणि अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती ही की, त्याला मनुष्याप्रमाणेच रहाण्यास मोकळी हवाशीर स्वच्छ जागा, पोटभर स्वच्छ खाणे, स्वच्छ पाणी, योग्य व्यायाम, आणि योग्य विश्राम इ० ची अवश्यकता आहे. त्याला कोठेही