पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ घरांतली कामें. nawwarnawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww. उपकारक प्राणी आहे, अशी जी आपली परंपरागत समजूत आहे; तिनें आपल्याला कसेंही झाले तरी गाय पूज्य वाटते, वंद्य वाटते, घराचें मंगल वाटते. तिच्या दानाचे आणि पालनपोषणाचे फार पुण्य सांगितले आहे. सभ्य लोक गोविक्रय करीत नाहीत. ती ब्राह्मणांचें नित्य अग्निहोत्राचे साधन आहे. तिचे पालन करणे क्षत्रियांचा परमधर्म आहे. तिचे संतान कृषि आणि वाणिज्याचा केवळ आधार आहे. फार जुन्या काळांत वसिष्ठ, जमदग्नि, भरद्वाज इ० ऋषींनी बाळगलेल्या गाईच्या अद्भुत कथा कोणाला अश्रुत आहेत? दिलीप राजाने गाईच्याच आशिर्वादाने पराक्रमी पुत्र, रघु, प्राप्त करून घेतला.भगवान् श्रीकृष्णाने गाईवासरांबरोबर बाललीला केली. गाईसारखी दूध देणारी आणि इतर प्रकारांनी कामी पडणारी हँस,बकरी,आणि दुसरी ही जनावरे आहेत. परंतु गाईची रमणीय आकृति, आणि पावित्र्य .१ही आपले लोकांची मनोभावना अज्ञात कालापासून आहे. गोपालन हजारों वर्षांपासून आपले लोकांत चालत आले आहे. त्यांचा उल्लेख वेदांत आणि. हिब्रू भाषेच्या अति जुन्या ग्रंथांत सांपडतो. इजिप्त देशांत ६००० वर्षांपूर्वी उभारलेल्या स्मारकावर यांच्या प्रतिमा कोरलेल्या पाहण्यांत येतात. मनुष्य जातीच्या सुधारणेच्या आरंभाच्या कालांत एखाद्याची संपत्ति मोजावयाची तर ती त्याच्या गोधनावरून मोजली जाई. गोत्र शब्दाचा गोपालनाशी संबंध आहे ह्मणतात. नाणे ज्याकाळी प्रचारांत नव्हते, तेव्हां क्रयविक्रयाचे साधन बैल असत. ती चाल हल्ली देखील कितीएक रानटी व न सुधारलेल्या लोकांत चालू आहे. पुराणांतून कितीएक राजांनी दहादहा हजार गाई दिल्याच्या ज्या कथा ऐकण्यांत येतात त्यावरूनही हे अनुमान बळकट होतें. जुन्या ग्रीस देशांत धातूचे नाणे जेव्हां प्रथम प्रचारांत आले, तेव्हां पूर्वीचें क्रयविक्रया, साधन जो बैल त्याचे आठवणीकरितां नाण्यावर बैलाची प्रतिमा उठविला होती. राशीमध्ये वृषभाची गणना झाली ही गोष्टही बैलाविषयींचे पूज्यभावाची निदर्शक आहे.