पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६७ www wwwwwwwwwww wmmmmmmwww प्रकरण १६ वें. mmmmmmmmm शेवटी हे प्रकरण संपवितांना एक सूचना येथे करावीशी वाटते. ती ही की, आपल्या लोकांत चैत्रमासांत हळदीकुंकुवाचे दिवशी गौरीपुढे आरास मांडतांना त्यांत धान्य उगविलेल्या कुंड्या कित्येक बायका मांडीत असतात. त्याऐवजी सुंदर फुलांच्या कुंडया स्वतः लावून त्या मांडण्याची चाल सुरू होईल, तर ती फार उपयुक्त व अधिक शोभादायक होईल. प्रकरण १७ वें. दूधदुभते. यत्र नास्ति दधिमंथनघोषो । यत्र न सन्ति लघुलघूनि शिशूनि a यत्र नास्ति भगवद्गुणचर्चा | तान्यरण्यसदृशानि गृहाणि ॥ गाईचे माहात्म्य-घरांत दूधदुभते असणे हे गृहस्थपणाचे एक लक्षण आहे. किंबहुना गृहस्थपण यथायोग्य संपादन होण्याला तें अवश्यक आहे; आणि ह्मणूनच पित्याने आपल्या कन्येचे विवाहसमयीं जामाताला गृहस्थाश्रमाच्या सिद्धीकरितां ज्या कितीएक वस्तु देण्याविषयी सांगितले आहे, त्यांत गाय ही मुख्य आहे. घरांतल्या दुभत्यापासून मुलांबाळांना दुधाची जी सोय असते, तिची सर बाजारचे दुधाला कधीही येऊ शकत नाही. ह्याशिवाय गाय ही देवता आहे. धरित्रीचे रूप आहे. अत्यंत अनुकंपनीय, अत्यंत १ गाईला नित्य प्रातःकाळी वंदन करावे असा आपला आचार आहे. - वसुबारशीला ( आश्विन व० १२ रोजी) स्त्रिया दिवसभर उपोषण करून सायंकाळी गाईची पूजा केल्यावर अन्नग्रहण करतात. गाईच्या अत्यंत उपकारकपणास्तव एका इंग्रज ग्रंथकाराने मटले आहे की, सुधारलेले लोक जर पुन्हां पशुपूजा करूं लागले, तर त्यांत गाईला निश्चयाने अग्रपूजेचा मान मिळेल. ( एनसा० वि० पु० ७ पान ७३८).