पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ घरांतली कामें. १ भाजीपाला-यांत घेवडा, वाटाणे, कोबी, भोपळा, मेथी इ० भाज्या लावाव्या. २ फळफळावळ-यांत केळी, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, आंबा, फणस, बोर, बेल, डाळिंब, आंवळा इ०ची झाडे जमिनीचा मगदूर पाहून त्याप्रमाणे लावावी. ___३ फुलझाडे-यांत बकुळी,हिरवा चाफा,सोनचाफा, मंदार,मालती, पारिजातक, जुई, मोगरा, गुलाब, चमेली, जास्वंद इ० झाडे लावावी. बागेच्या सभोंवतीं आणि मधून मधून रोशीवर मेंदी, व दुसरे छायावृक्ष, कढीलिंब, लिंब, कवठ, इ० झाडे लावावी. स्वतंत्र बाग-यासंबंधाने निराळे सांगण्याची अवश्यकता नाही. या आणि वराभोवतालच्या बागेत फरक येवढाच की, स्वतंत्र बागेत जमीन पुष्कळ असल्यामुळे तेथे झाडांना पाणी देण्यासाठी मोटेची किंवा मोठ्या विहिरीतून वर पाणी काढण्यासाठी पंपाची अवश्यकता असते व या उपायांनी त्या बागेतून उत्पन्नही पुष्कळ अधिक काढतां येते. कामाला आरंभ-वर बागेचे निरनिराळे प्रकार आणि त्यांची आवडनिवड यांविषयी सामान्यतः वर्णन करण्यात आले आहे. पण बागेत झाडे लावावयाची ती कशी, व त्यांची जोगवण कशी करावयाची, तें अगोदर समजणे हे अवश्य आहे. आणि हे बागकामासंबंधाच्या पुस्तकांचे वाचन, प्रत्यक्ष माळ्याकडून मिळणारी अनुभविक माहिती व स्वतःचा अनुभव, यांच्याच साह्याने होणारे असल्यामुळे, व या विषयावर मराठीत एक दोन चांगली पुस्तकें अगोदरच स्वतंत्र रीतीने प्रसिद्ध झाली असल्यामुळे, त्या माहितीचा समावेश विस्तारभयास्तव येथे करीत नाही.