पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १६ वें. खोल जाऊन कायमची झाडे होतात, अशी झाडे तेथे लावू नयेत. उदा०-मेंदी, पिवळा गुलाब, जुई, शेवती, निशिगंध, सूर्यफूल, गुलबास, दूर्वा इ० न व्हरांडा (पडवी), सज्जा वगैरे-- व्हरांडा चांगला प्रशस्त असला, तर त्याच्या कांठाशी आणि त्याचा ओटा उंच असेल तर त्या ओट्यास लागून जमिनीवर कांहीं दूरपर्यंत फुलझाडांच्या कुंडया व लाकडी टबवर तारेची पात्रे वगैरे ठेवतां किंवा टांगतां येतात. त्यांत लावावयाची रोपें सुगंधित, शोभेची, ज्यांची पाळे दूरवर जात नाहीत व ज्यांना ऊन व पाणी फारसे लागत नाही, अशी असावीत. उदा०-गुलाब, निशिगंध, शेवती, अमरवेल, व ज्यांच्या मुळाशी कांद्यासारख्या गांठी असून, ज्यांतून वर फुलांचे व पानांचे गुच्छ निघतात [ यांना इंग्रजीत बल्ब ह्मणतात ] अशी रोपें, रोपाची एकेक कुंडी किंवा दोन तीन चार कुंड्यांचा समुदाय ओळीने किंवा खांबाखांबाशी ठेवतात. शक्य असल्यास गलेरीवजा किंवा एकेरी घडवंच्या करून त्यांवरही कुंड्या ठेवतात. - पडवीच्या खांबावर आणि दाराच्या तोरणावर, दारापुढील मंडपावर, कंदिलाच्या खांबावर, घराच्या खिडक्या, जाळ्या, गवाक्षे इ० वर वेली चढवितात. पण त्या वेली मोठाल्या किंवा दाट पानांच्या. सुगंधि पुष्पांच्या किंवा जाड फांद्यांच्या अगदी लावू नयेत आणि त्या फार वाढल्या असतां वेळच्या वेळी त्यांची छाटाछाट करीत जावें. घराभोंवतीं बाग असावयाची ती घराला अगदी लागून नसावी. घर आणि बाग यांमध्ये बरीच खुली जागा असावी. जागेचा विस्तार व पाण्याची सोय असेल, त्याप्रमाणे भाजीपाला, फळफळावळ, फूलझाडे असे बागेचे निरनिराळे विभाग करावे.