पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. ज्या झाडांना सतत पाणी मिळण्याची अवश्यकता असते, अशीच झाडें विशेषेकरून परसांत लावावी. अशा झाडांची निवड करण्यांत शोभेपेक्षां लाभाकडे अधिक दृष्टि ठेवावी, व ती अशा रीतीने लावावी की, त्यांपासून इच्छित लाभ बारमहा सतत घडत राहील. उदाहरणार्थ कांही झाडांची नांवे येथे सांगतों: फळझाडे-केळ, शेवगा, मिरची. फुलझाडें—कण्हेर, कर्दळी, अगस्ति, पारिजातक, तगर, गुलाब, शेवती, मोगरा, इ०. वेली ( चातुर्मासिक )—दोडकें, गिलके, तोंडलें, कारले इ०. 7 औषधोपयोगी–देवकापूस, आले, कोरफड, अडुळसा, ब्राह्मी, गुळवेल, पुदिना, दवणा इ०. पुढील चौक किंवा अंगण—पुढील चौक चांगला विस्तृत असेल व तितकी अवश्यकता असेल, तर त्याची काही जागा गाडीघोडे फिरण्याइतकी सभोंवतीं सोडून मध्यभागी मंडलाकार, त्रिकोणाकृति, चतुष्कोणी, किंवा धनुष्य, कमल इ० आकारांची बाग तयार करावी. मधून मधून फिरण्यासाठी पायवाटा ठेवाव्या. या जागा आंखण्याचे काम एखाददुसरी खुंटी व सुतळी येवढ्या सामानाने करतां येते. ते असें-खुंटी मध्ये पुरावी, तिला सुतळीचे एक टोंक बांधून दुसऱ्या टोकाने मोजमाप घ्यावे आणि त्या बरहुकूम खुरपीने जमीन उकरून खुणा कराव्या. जर दाराशी गाडी घोडे येण्याची अवश्यकता नसेल किंवा तसे करण्याची सोय नसेल, तर दारासमोर चांगला. पैस रस्ता ठेवून, दोन्ही बाजूस बाग लावण्यास हरकत नाही. ___चौकांत लावण्याची झाडे विशेषेकरून शोभेची व सुवासिक फुलांची असावी. ज्यांना नेहमी पाणी लागते, किंवा ज्यांची मुळे