पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १६ वें. १६३ ण्याची व उन्हाळ्यांत रात्री क्षणभर हवाशीर पडण्याची हीच जागा असते. असा प्रकार असेल, तेव्हां त्यांत झाडे-झुडपें न लावतां जागा मोकळी ठेवणेच योग्य आहे. कारण झाडे लावण्यापासून सुख न होतां उलट मंडळीला अडचण मात्र व्हावयाची, व आपले श्रम मात्र फुकट जावयाचे, या सर्व कामाला पुरून उरेल तेथे बाजूला नेहमी उपयोगी पडणारी एक दोन झाडे लावावी ह्मणजे पुरेत.' - परस प्रशस्त असून त्यांत मोकळी जागा पुष्कळ असेल, तर त्यांत कांही झाडे लावावी. मात्र वड, पिंपळ,उंबर, आंबा किंवा अशा जातीचे दुसरें कांहीं झाड लावू नये. कारण, अशा झाडांची पाळेंमुळे परसभर पसरतात. त्यांच्या छायेंत दुसरी झाडे वाढत नाहीत, व बागेचा हेतु सफळ होत नाही. या झाडांच्या बुंध्याशी मुंगळे, मुंग्या, वगैरे कीटक होतात, खारी झाडावर घरे करतात, झाडांची पाने गळून पडतात, असा अनेक प्रकारे त्रास होतो. छायेसाठी पाहिजे तर लिंबाचें, अशोकाचे किंवा दुसरे एखादें निरुपद्रवी झाड लावावें. ज्या वेली फार फोफावतात, ज्यांना मोठी व दाट पाने येतात, ज्यांच्या फुलांस उद्दाम वास येतो व ज्या गुरांना आवडतात, अशा वेली [ उदा०-लाल भोपळा, पडवळ, चमेली ] परसांत लावू नयेत. यांत सर्प वगैरे विषारी प्राणी लपून बसण्याचा संभव असतो, व गुरें नजर चुकवून अशा वेलींना खाऊन टाकतात. १ पूजा, प्रदक्षिणा वगैरेसाठी असे एखादें झाड लावण्याची इच्छा होते, पण हे लक्षात ठेवावें की ज्या नेमधर्मासाठी तें लावावयाचे ते नेमधर्म सततचे नसतात. अशा झाडांची उपाधि मात्र सततची असते. शिवाय अशा झाडांवर मुंजा, भुतें, वगैरे वास करतात अशी भीति भोळ्या व भित्र्या बाया मुलांच्या मनांत प्रवेश करते. यासाठी नेमधर्मासाठी पाहिजे तर ही झाडें कुंड्यांतून लावावी, आणि काम झाल्याव तो कुंडा दुसरीकडे पोहोचविण्याची व्यवस्था करावी. झाडांची अदलाबदलशा रीतीने वाटेल तितके वेळां करता येईल.