पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. पानांचे द्रोण दोनटाकी, किंवा चारटाकी लावतात. दोनटाकी द्रोण डोंगीसारखा लांबट व चारटाकी द्रोण चौकोनी असतो. केळीच्या द्रोणाला पाने मऊ लागतात. निबर असली तर चोयीने लांबपर्यंत फाटतात. निबर पाने शेकल्याने नरम होतात. केळीचे द्रोण लाव - ण्याचे काम चातुर्याचे आहे. ते प्रत्येकाला साधत नाही. पळस व मोह यांचे द्रोण दोन पानांचे व चार टाक्यांचे लावतात. त्यांचा गोल आकार शोभिवंत दिसतो. द्रोणाला बूड मात्र असले पाहिजे. नाहीतर द्रोण पानावर नीट बसत नाही, लवंडतो. अभ्यास असलेला मनुष्य चार तासांच्या बैठकीला सुमारे चारशे पांचशे द्रोण सहज लावतो. द्रोणांचे कान बाहेर आले असल्यास ते ओलेपणींच कातरून त्यांची पुडकी लहान मोठी बांधून ठेवावी, आणि सावलीत हवाशीर जागी टांगून ठेवावी. पत्रावळी करणे झाल्यावर फाटकीं तुटकी, लहान मोठी पानें शिल्लक राहिली असतील, ती सर्व पाने एका माळेत ओवून ठेवावी. त्यांचा प्रसंगविशेषीं उपयोग होतो. ती पाने ऊन पाण्यात भिजवून घेतली असतां टाका लावण्यास तत्काल अनुकूल होतात. दुसऱ्याही अनेक कामांत त्यांचा उपयोग होतो. सुटी पाने जर ताजी नेहमी मिळण्यासारखी असतील, तर वाळलेल्या पानांची माळ करून ठेवण्याचे काही कारण नाही. पत्रावळी करून त्या विकण्याचा धंदा करणारे लोक शहरांतून असतात. यांच्या दुकानांतून पत्रावळी व द्रोण विकत घेतांना ते नीट पाहून घेतले पाहिजेत. कारण, पुष्कळ असे धंदेवाले लोक लबाड्या करतांना आढळतात. बिघडलेल्या पत्रावळी चांगल्या पत्रावळीत मिसळून त्या ते गि-हाइकांच्या पदरांत बांधतात.