पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mawww प्रकरण १६ वें. १५९ xxxwwwanmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm ज्याला पत्रावळी लावण्याची संवय आहे, तो मनुष्य चार तासांच्या बैठकीत साधारण आकाराच्या ५० पत्रावळी लावतो. मोहाच्या पत्रावळीचे काम बिकट असते. त्या पत्रावळी १२।१५ लावतां येतात. . पत्रावळी लावण्याचे काम तिसरे प्रहरी रिकामेपणी करावें. रात्री दिव्याशी बसून करू नये. त्यापासून डोळ्यांना त्रास होतो, ठेवणीच्या पत्रावळी प्रथम सावलींत चांगल्या वाळवाव्या. ओल्या राहूं देऊं नयेत. लावतांनाच त्या पसरून ठेवाव्या, आणि त्यांवर पाट, जाजम किंवा दुसरे कांहीं दडपण सारखें घालावें. आठ दहा तासांनी त्या वाळल्या ह्मणजे त्यांची उलट पालट करावी. ह्मणजे खालचे अंग वर व वरचे खाली करावें. ओल्या पत्रावळींचा ढीग केल्यास त्या उबतात, त्यांस काळे डाग पडतात, व बुरा चढून वाईट वास येऊ लागतो, इतका की त्यावर जेववत नाही. पत्रावळी वाळल्यावर एकीवर एक सारख्या रचून दाबून सुतळीनें त्यांचे शंभरांचे किंवा पन्नासांचे पुडकें बांधावे. त्या मोकळ्या ठेवल्याने वाळून फाटतात. पत्रावळीची आकृति सारखी गोल असावी. यासाठी पानांचे कोपरे बाहेर आले असल्यास कातरीने कापून गोल करावे. पत्रावळीची पुडकी कोंदट हवा येत नाही, अशा ठिकाणी किंवा ओलसर जागेत ठेवू नये. निजण्याबसण्याच्या जागेपासून त्या दूर ठेवाव्या. कारण त्यांत विंचवासारखे प्राणी व कीटक लपून बसण्याचा संभव असतो. द्रोण-हे केळीच्या पानांचे, पळसाचे व मोहाच्या पानांचे लावतां येतात. इतर पानांचे द्रोण तितके चांगले होत नाहीत. केळीच्या