पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १६ वें. mmmmmmmmm ennnnnnnnnn 1. पत्रावळी घेतांना रोजच्या जेवणाला किंवा फराळाला त्या पाहिजेत किंवा पंक्तीसाठी पाहिजेत, ते पाहून त्या मानाने लहान मोठ्या घेतल्या पाहिजेत. रोजच्या जेवणाला मोठ्या किंवा पंक्तीच्या जेवणाला लहान पत्रावळी व द्रोण उपयोगाचे नाहीत. केळीची पाने कापतांनाही असाच विचार व तारतम्य ठोविले पाहिजे. प्रकरण १६ वें. बागेची निगा. कुटुंबवत्सल गृहस्थाच्या प्रपंचाला रोज भाजीपाल्याची तशी फळफळावळ व फुले यांचीही गरज लागते. हे जिन्नस शहरांतून व मोठाल्या गांवांतून बाजारांत आयते मिळतात. तरी त्यांस पैसे फार पडतात, आणि ते हवे त्यावेळी ताजे व मनाजोगे मिळत नाहीत. यासाठी स्वतःच्या घराभोंवतीं लहानशी बाग असणे अवश्य आहे. झाडे व वेली यांच्या योगाने घराला शोभा येते. त्यांच्या फुलाफळांची रमणीयता नेत्रांना सुख देते. वनस्पतींच्या योगाने हवाही शुद्ध होते, व उष्णतेचा ताप कमी होतो. शिवाय, बागेच्या कामाने अनायासें शरीराला व्यायाम घडून मनाची उत्तम करमणूकही होते. असे घराभोवती लहानशी बाग करण्यापासून अनेक फायदे आहेत. घरगुती बागेचे प्रकार—घरगुती बागांचे अनेक प्रकार आहेत. श्रीमान् लोक आपल्या मोठाल्या बागेतच बंगले बांधून राहतात. काही लोकांच्या बागा घरापासून दूर असतात. काही लोक परसांतच झाडे व वेली लावतात. कित्येकांच्या घरापुढे मोकळ्या जागेत एखादा क्यारा दूर्वा व लहानमोठी झाडे किंवा वेली यांनी आच्छादित असतो. काही लोक व्हरांड्यांत (पडवीत) व सज्जांत ११ ।