पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ घरांतली कामें. १ मधले पान सर्वांत मोठे असेल तें आधी निवडून घ्यावे. २ प्रत्येक घेराला पानें सारखी घ्यावी, लहान मोठी घेऊ नयेत. ३ प्रत्येक पान सुलटे लावावें, एक उलटे व एक सुलटें, असें लावू नये. ४ पान वरून जोडावे. ते जोडतांना खालचे पान विनाकारण ज्यास्त आंत दाबले जाऊ नये. ५ पाने उजवीकडून डावीकडे लावीत गेल्यास ती पत्रावळ अशुद्ध समजली जाते. ६ चोयीचा टाका काठाला गहूंभर जागा सोडून लावावा. यापेक्षां ज्यास्त खाली लावू नये. दोन टाक्यांत अंतर गहूंभरच राहावें. सगळे टाके आडवे एका ओळीत यावे. मागे-पुढे येऊ नयेत. जणूं टीपेचा दोराच भरला आहे असे ते दिसावे. प्रत्येक टाक्याची दोन्हीं टोकें सारखी बाहेर निघालेली असावी. उद्देश हा आहे की पत्रावळीवर भात वगैरे कालवितांना अन्न जोडाच्या संधींतून आत शिरूं नये, व बोटांच्या स्पर्शाने टाका निघून अन्नांत कालविला जाऊ नये. पत्रावळीचा शंगार करण्यांत निरर्थक श्रम व वेळ मात्र घालवू नये. ७ मोहाच्या पत्रावळीला मधलें पान एकच पुरत नाही. त्यासाठी तीन चार पाने सारखी एकास एक जोडून मग घेरास सुरुवात करावी, आणि ४ किंवा ५ हवे तेवढे घालावे. १ काही वर्षांपूर्वी बडोद्यास पत्रावळी करण्याचा धंदा करणारे लोकांनी प्रथम त्या टाक्यांत फुलें-वेली, नंतर मंडळींची नांवे आणि नंतर श्लोक व गाणी काढणे सुरू केले होते. हा प्रकार क्षणमात्र मौजेचा असला तरी त्यापायीं केलेला श्रम, व घालविलेला काळ अनाठायीं होता असें झटले पाहिजे. कारण, त्या मानाने - मौज उपभोगांत येत नसे.