पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १५ वें. १५५ णाने भोंक पाडून ती पाने एका सुतळीत ओंवून माळ करावी, आणि ती माळ दोन खुंट्यांना आडवी टांगावी. अशाकरितां की त्यांस वारें लागावें व ती एकमेकांच्या आश्रयाने सरळ रहावी, दुमद्रं नयेत. अशा रीतीने ठेवलेली पाने चांगली आठ पंधरा दिवस नरम व हिरवीगार राहतात. मद्रासेकडे माहुली नांवाचे झाड आहे. त्याची पाने आभेटाच्या पानाच्या आकृतीची असून नरम असतात. यांच्या पत्रावळी लावून विक्रीसाठी देशावर पाठवितात. - मोहाच्या पानांची पुडकी बांधून ठेवता येतात. पण ती ओली आहेत तोच त्यांच्या पत्रावळी लावतां येतात. ह्मणून या पानांचा. साठा कोणी फारसा करीत नाहीत. चोया--या बांबूच्या किंवा बोरूच्या करतात. बोरूच्या चोया नरम असतात. त्या पत्रावळी लावण्यास चांगल्या. कडू लिंबाच्या काड्या उन्हाळ्यांत वाळून गळून पडतात. त्याही तात्पुरत्या पत्रावळी लावण्याच्या उपयोगी पडतात. चोय चांगली लांब करावी ह्मणजे पुष्कळ वेळ टिकते. ती सरदली असतां लवकर तुटत नाही, तेव्हां एकादा तवा किंवा टिनाचा पत्रा विस्तवावर ठेवून त्यावर चोया पसरतात, ह्मणजे विस्तवाच्या आगीने त्या टणक होतात. चोया फुरसत मिळेल तेव्हां अगोदर करून ठेवाव्या. मात्र त्या ओलसर जागेत ठेवू नये. पत्रावळ लावणे-पळसाच्या डगळ्यांतील मधलें पान मध्ये ठेवून बाजूंची पाने त्या पानाचे भोंवतीं शिराकडून आरंभ करून डावीकडून उजवीकडे लावीत यावे व अशा रीतीने दीड, दोन किंवा तीन घरांत पाने मोठी किंवा लहान असतील, त्या मानाने पत्रावळ संपवावी. पत्रावळ लावण्याचे संबंधांत पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्याः