पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें, लेली असते. कर्दळीची दोन पाने एकाला एक रुंदीला जोडून मध्ये टाके दिले असतां जेवण्यासारखें बेताचें पान होते. मांडण्याची त-हा केळीच्या पानासारखीच. पत्रावळ-अनेक लहान लहान पाने एकास एक जोडून एका विशेष आकृतीचे भोजनपात्र करतात, त्यास पत्रावळ ह्मणतात. हिची पाने चोयांच्या टाक्यांनी जोडलेली असतात. या । पत्रावळीसाठी सर्वांत उत्तम पाने ह्मणजे पळसाची, आणि त्यांच्या खालोखाल मोहाची. या पानांच्या पत्रावळी तत्काल किंवा पाहिजे तर मागून केव्हाही उपयोगी पडतात. फणस, मुचकुंद चगैरेंच्या पानांच्याही पत्रावळी करतात; पण त्या तत्काल उपयोगी पडणाऱ्या असतात, टिकाऊ नसतात. पळसाला मोठाली पाने येतात. तीन तीन पानांची बहुधा एकेक डगळी असते. एकादा पाऊस पडेपर्यंत ही पानें नरम असतात. पुढे निबर होतात. __मोहाचे झाड उन्हाळ्यांत पालवीस येते. त्याची पाने भाद्रपदाच्या कांहीं अगोदर पत्रावळी लावण्याजोगी पक्क होतात. भाद्रपदांतच महालयेही असतात. ह्मणून कदाचित् महालये व मोहाच्या पत्रावळी यांची सांगड घालून देण्यात आली असेल. पत्रावळी लावण्यासाठी लागणाऱ्या पानांचा संग्रह योग्य मोसमावर करावा लागतो. पळसाचे तीन तीन पानांचे डगळे तसेच राहूं दिले तर एक दोन दिवसांत पाने सुकून वाकडी तिकडी होतात. ह्मणून ती पानें देठापासून खुडून एकावर एक रचून नीट दडपणाखाली दडपून ठेवावी लागतात. पत्रावळी लावण्यास लागलीच वेळ नसेल आणि पाने पुष्कळ असतील तर त्यांच्या देठांच्या बाजूने दाभ