पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १५ वें. १५५ mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm पानांचे दोन वर्ग करता येतात. एक त्यावेळेपुरती उपयोगी पडणाऱ्या पानांचा व दुसरा टिकाऊ पानांचा. केळीची पाने पहिल्या वर्गात, आणि पळसाची दुसऱ्या वर्गात येतात. जेवणाखाण्याचे वेळी चारी ठाव वाढण्याला एकच मोठे पान घ्यावयाचे असेल, तर असें पान केळीचे होय. साधारण जेवणाला कर्दळीची किंवा पळसाची दोन मोठाली पाने जोडूनही काम भागवितात. कमळाची व अळूची पानेही मोठाली असतात; पण ती फारच पातळ व नाजूक असल्यामुळे त्यांचा कचित्च उपयोग करतात. केळीची पाने-केळीला बहुधा श्रावण-भाद्रपदाच्या सुमाराला पुष्कळ पाने फुटतात, आणि हिवाळ्याच्या अखेरपर्यंत त्यांचा भर असतो. पुढे उन्हाळ्यांत ती कमी निघतात, व वाऱ्याने फाटतात. सामान्य केळीचे पान बहुधा चार हात लांब असते, आणि त्यांतून जेवण्यास घेण्याजोगी तीन पाने चांगली व चार सामान्य निघतात. या पानाचे साधारण प्रमाण सवा हात लांब आणि तितकेंच रुंदीचे आहे. कित्येक पाने अरुंद असतात. । ज्या गांवाला केळीच्या बागा असतात, तेथे केळीची पाने बाजारांत विकावयास येतात. - पंक्तीसाठी केळीची पाने कापतांना, ती सारख्या लांबी रुंदीची असलेली चांगली दिसतात, ह्मणून तशी कापावी. त्यांची मधली जाड शीर तासावी, पण तसे करतांना पान मात्र फाढू देऊ नये, आणि मांडतांना मूळ खाली आणि अग्र वर असें मांडावें. कर्दळी-ही केळीचीच एक जात आहे, मात्र हिची पाने लहान, पातळ व अरुंद असतात. ही बहुतकरून बागेत शोभेकरितां लाव