पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ घरांतली कामें. mm श्राद्धीय भोजनाला मोह अवश्यक मानला गेला आहे. कोणी कितीही श्रीमान् आणि संपन्न असला, तरी त्याने श्राद्धीय ब्राह्मणांना मोहाच्याच द्रोण-पत्रावळी देण्याचा नियम आहे. फणस, कुडा, इ० झाडे ज्या प्रदेशांत ती होणारी आहेत, तेथेच उपयोगांत येतात. औदुंबर, जांभूळ, आंबा, इ० ची पाने विशेष व्रतोपवासादिकांनाच घेतात. निषिद्ध पानांपैकी वडाचा निषेध विशेषेकरून काशीयात्रा करून येणाराला केलेला आहे. ब्राह्मणाच्या मुलाचे उपनयन झालें ह्मणजे तो काशीस अध्ययनासाठी जातो, अशी कल्पना आहे. ह्मणून द्विजत्वाचा संस्कार झाल्यापासून त्याला कधीच वडाच्या पानाचा उपयोग करतां येत नाही. स्त्रियांनी प्रत्यक्ष काशीयात्रा केली असली, तर त्यांना वडाच्या पानाला निषेध आहे; तथापि पुष्कळ पोक्त बायका पापड्या वडाच्या पानावर करतांना पाहण्यात येतात. त्यावेळी वडाचे पान त्या निषिद्ध समजत नाहीत. व्यवहारदृष्टीने ग्राह्याग्राह्यतेचा विचार केला, तर ज्या पानांत पुढील गुणधर्म असतील ती ग्राह्य व नसतील ती त्याज्य होतील १ पान मोठे असावे. निदान सात आठ पाने जोडल्यावर तरी त्यांचा आकार जेवणाचे सगळे पदार्थ मावण्याइतका मोठा झाला पाहिजे. २ पान कोवळे पण दळदार असावें, तें खरखरीत असू नये. सपाट असावें. त्याच्या काठाला कंगोरे नसावेत. पाठीचा कणा फार जाड नसावा. असला तर तो सहज हाताने काढतां यावा आणि काढतांना पानाचे तुकडे होऊं नयेत. पानाच्या शिरा फार वर आलेल्या नसाव्या. त्यास भोंके पडलेली नसावी. पानांत चीक किंवा दूध भरलेले नसावे. त्याला उद्दाम वास येऊ नये. तें किड्यांनी खाल्लेलें नसावें. पानांवर काटेकाटे किंवा बारीक लव नसावी.