पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १५ वें. १५३ ramwww rrrrrrrrrrrrrrrrrrronm बरेच लोक नेमधर्मी असत. धातूच्या पात्रांत पुनः पुनः जेवणे निषिद्ध मानले असल्यामुळे, ते जेवणास ताट-वाट्या घेत नसत. कित्येकांचा तर बाराही महिने पत्रावळीवरच जेवण्याचा नियम असे. आतांचा मनु सगळ्याच बाबतींत निराळा आहे. मध्यम वर्गाच्या लोकांत देखील आतां पान-पत्रावळीचा साठा करून ठेवण्याची चाल राहिली नाही. तरी अद्याप पान-पत्रावळ व्यवहारांतून अजिबात गेली आहे, असें मात्र नाही. ब्राह्मणी कुटुंबांत परसांत एखाद-दुसरे केळीचे झाड लावण्याची व त्याचे पान जेवणास घेण्या-देण्याची चाल अजून काही ठिकाणी दिसते. ताट, वाट्या, व चिनी मातीच्या आणि एनामेल केलेल्या लोखंडी पत्र्याच्या बशा घरांत असतांही मुलांना थोडे फार फराळाचे देण्यास व पंक्तीतून लोणचें कोशिंबिरी वाढण्यास पानांचा उपयोग करण्यांत येतो, व चार दोन माणसें जेवण्यास बोलाविली असतां जेवण्यास घेण्यास पान-पत्रावळीचाच आश्रय करावा लागतो. ह्मणून यासंबंधाची माहिती प्रापंचिकाने करून घेण्याची अवश्यकता आहे. आपल्या आचार-पद्धतीप्रमाणे काही झाडांची पाने भोजनास विहित आणि काही निषिद्ध मानली आहेत. विहित मानलेल्या पानांत कांही सर्वदा आणि काही विशेष प्रसंगी मात्र ग्राह्य असतात. निषिद्ध पाने सर्वदा त्याज्य समजावी. विहित पाने-केळी, पळस, मोह, फणस, कुडा, औदुंबर, आंबा, जांभूळ इ० निषिद्ध पाने-वड, रुई, पिंपळ, टेंभुरणी इ० ग्राह्याग्राह्य-केळीचे पान सर्वदा जेवणाला ग्राह्य आहे. पळस श्राद्धीय भोजनाला आणि मोह मंगलकार्यांत भोजनाला ग्राह्य नाही.