पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ घरांतली कामे. mmmmmmmmmmm उचलून घेणे न घेणे त्या मोठ्या माणसाच्या मर्जीवर असते. विडा घ्यावयाचा नसल्यास, तो तबकाला नुसता स्पर्श करतो. तेव्हां ते विडे त्याच्या शागिर्दाला द्यावे... स्त्रियांनी आपला पति, पुत्र, आणि सासरची किंवा माहेरची निकट संबंधाची वडील माणसे यांच्याशिवाय इतर कोणासही आपल्या हाताने विडा लावून किंवा उचलून देऊ नये. असा सक्त नियम आहे. स्त्रीने परपुरुषाला विडा लावून देणे किंवा मुलांमाणसाच्या हातून पोहोचविणे अश्लाघ्य समजतात. तथापि ज्याच्या संबंधानें आदरयुक्त प्रेमभाव आहे किंवा नात्यासंबंधाने ममता वाटते, अशा पुरुषाला तिने विडा लावून दुसऱ्याच्या हातून दिला किंवा त्याच्या पुढे ठेवविला, तर तें क्षम्य आहे. विडा किंवा पानसुपारी द्यावयाची, ती नेहमी उजव्या हाताने द्यावी. प्रकरण १५ वें. पान-पत्रावळ. तीस चाळीस वर्षांपूर्वी बहुधा घरोघरी पान-पत्रावळीचा वर्षभरचा साठा करून ठेवण्याची चाल असे. त्याला तशी बलवत्तर कारणेही होती. कुटुंबांतली सर्व मंडळी बहुधा एकत्र राही, त्यामुळे घरांत माणसांची संख्या मोठी असे. दुसरें, त्या दिवसांत तांबें पितळेचीच भांडी तेवढी वापरीत. त्यांतही तांब्याचे भांडे जेवणाखाण्याला वयं मानले गेल्यामुळे,सगळा भार पितळेच्या भांड्यांवर येऊन पडे. तिसरे, कार्य प्रयोजनाला बहुधा सर्व गावकऱ्यांना-निदान आपल्या आळीतल्या तरी सर्व लहान थोरांना बोलावीत. इतक्या मंडळीला जेवण्याचे घेण्यास ताट-वाट्या कोठून आणणार ? चौथे कारण, त्या वेळचे