पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १५१ wwwwwwwwwwwwww रीकडे कातरलेल्या सुपारीची रास घालून ठेविलेली असते. दोन दोन पाने घेऊन त्यावर थोडी सुपारी घालून ती पानें, अग्रे घेणाराकडे व देंठ देणाराकडे करून, देतात. पुष्कळ मंडळी असली तर अगोदरच दोन दोन पाने वर सुपारी घालून तयार ठेवतात, ह्मणजे थोड्या वेळांत पानसुपारी देणे उरकतें. या दोन दोन पानांच्या जोड्या वर सुपारी घातलेल्या तबकांत अशा रीतीने एकीवर एक रचतात की, तबकाच्या मध्याकडे सर्व पानांची अग्रे व काठाकडे देंठ येतील. अशा रीतीने तबकांच्या घेरभर त्या लावून ठेवतात. एक रांग संपली की, तिच्यावर एका पानजोडीच्या उभ्या अर्ध्या भागावर दुसरी पानजोडी, तिच्यावर तिसरी, याप्रमाणे साधारणपणे दोन तीनशे पानजोड्या ठेवितां येतात. खिचडी-हणजे विड्याचा मसाला. पान-सुपारी देण्याचे वेळी अनुकूलता असल्यास चिकण सुपारीची खांडे, लवंगा व वेलदोडे यांची खिचडी देतात. उत्तरहिंदुस्थानांत ही खिचडी निदान अर्धमूठ तरी देण्याची चाल आहे. विशेष चाली-आदरातिथ्याचा विडा देण्याची चाल दक्षिणेत निराळी, व उत्तरहिंदुस्थानांत निराळी आहे. दक्षिणेत विडा लावून न देतां विड्याचे तबक पुढे करतात, व ज्याचा तो विडा लावून घेतो. उत्तरहिंदुस्थानांत घरचा यजमान निमंत्रित पाहुण्यांना स्वतःआपल्या हाताने पट्ट्या लावून देतो. या मोठ्या माणसाने आपल्या हाताने लहानास विडा देणे हे मोठ्या कृपेचे चिन्ह समजले जाते. लहानाने मोठयाच्या हातीं विडा न देतां तो एका तबकांत घालून तें तबक पुढे करावे. या तबकांत एकच विडा मात्र नसावा. निदान पांच चार तरी असावे. त्यांतले कांहीं