पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० घरांतली कामें. wwwmorani ६ विषबाधा झाली असतां, मूर्छा आली असतां, किंवा पाण्याचा शोष पडला असतां विडा खाऊ नये. ७ तोंडांत विडा ठेवून झोपू नये, ८ रस्त्याने चालता चालतां विडा खाऊ नये. ९ वडील व पूज्य मणसापुढे विडा खाऊन जाऊ नये. १० लहान मुलांचे कोंवळे दुधाचे दांत पडून जाईपर्यंत त्यांनी विडा खाऊ नये. ११ विद्यार्थी, विद्यार्थिनी, व विधवा स्त्रिया यांनी विडा खाऊं नये. १२ सुवासिनी स्त्रियांनी पति परगांवीं गेला असतां विडा खाऊ नये. तो जवळ असतांना सुद्धां एकादा विडा खावा, पण उठतां बसतां विडा खाणे चागले नाही. १३ गर्भिणी स्त्रीने विडा खाऊ नये. १४ संन्यासी, बैरागी, वगैरे विरक्त माणसांनी विडा खाऊ नये. १५ व्रत वगैरेंचे आचरण चालले असतां, एकादशी, शिवरात्र वगैरे उपोषणाचे दिवशी, व सुतकाच्या काळांत विडा खाणे वज्ये केले आहे. १६ दांतांचे किंवा डोळ्यांचे विकार असलेले, अंगाला व्रण झालेल, रक्तपितीने ग्रासलेले, वाताचा विकार असलेले, श्वासरोगी, व क्षयरोगी, यांनी विडा खाऊ नये. सन्मानाची पानसुपारी-लग्नकार्यासारख्या कार्यप्रसंगाला किंवा दसरा, संक्रांत, गणपतिउत्सव वगैरे दिवशी आपल्या घरी चारमंडळी ( स्त्री व पुरुष ) येते, त्यांना सन्मानार्थ पानसुपारी देण्याचा चाल आहे. याकरितां एका तबकांत एकीकडे पानांची रास व दुस