पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १४९ हानि होते. दांतांना कीड लागते; तोंडाला दुर्गंधि येऊ लागते, पचनशक्ति बिघडते, आणि अंगांतील वीर्याचा नाश होतो, असे सांगतात. विड्याबरोबर आणखी तंबाखू खाणारांविषयीं तर बोलावयासच नको. विडा आणि तंबाखू या दोहोंचे अवगुण एकवटल्यावर दुप्पट हानि होते यांत आश्चर्य काय ! तंबाखू खाणाराच्या तोंडाला लाळ सुटते, त्यामुळे त्याला थुकण्यासाठी वारंवार उठावे लागते. इतके वेळ उठण्याचा मनुष्य आळस करतें. मग कोठे धुंकावे आणि कोठे नाही याचा विचार राहत नाही; आणि कित्येक बसल्या जागी घाण करून ठेवतात. थुकतांना थुकीचे शिंतोडे माणसाच्या कपड्यावरही कित्येक वेळां उडतात, व तोंडावरून खाली ओघळ येऊन सगळा ओंगळपणा दिसतो, हे तर निराळेच. _आरोग्य, मर्यादा व शिष्टाचार यांच्या रक्षणासाठी काही लोकांना विडे खाण्याचा निषेध आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रीतीने केला आहे. विडा कोणी, केव्हां, किंवा कशा प्रकारे खाऊ नये या विषयींचे पुढील नियम लक्षात ठेवावे: १ तांबोळ्याच्या दुकानचे आयते लावलेले विडे खाऊ नयेत. २ अपरिचित माणसाने दिलेला विडा खाऊ नये. त्याचा अनादर करावयाचा नसला, तर नुसता घेऊन ठेवावा, व त्याची पाठ वळल्यावर फेकून द्यावा. ३ समाजांत दिलेला विडा तेथेच खाऊ नये. मागाहून देखील खाण्यापूर्वी तो नीट उलगडून पहावा आणि मग वाटल्यास खावा. ४ अनशेपोटी विडा खाऊ नये. ५ दुपारी निजून उठल्यावर, पुष्कळसें दूध प्याल्यावर, स्नान केल्यावर, किंवा ओकारी झाल्यावर, लागलीच विडा खाऊ नये.