पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ घरांतली कामें. mammmmmmar यांना लवंग टोचावी लागत नाही. दुसरे विडे लवंग टोचून करतात. दरबारी विडा ह्मणजे पांच सहा पानांची उभी सुरळी करून त्यांत विड्याचा मसाला व सगळ्या सुपाऱ्या एक दोन ठेवून वरून सूत गुंडाळावयाचे. या सुरळ्यांत पानांची सुलट बाजू वर करावयाची असते. दरबारच्या पानसुपारीचे वेळी ज्याच्या त्याच्या मानमरातबाप्रमाणे माणशी दोन पासून पांचपर्यंत या सुरळ्या देण्याची चाल आहे. वी विडे-गोविंद विडे चांगले मोठाले करून त्यांना वरून पाण्याचा हात लावून चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख चढवितात. सबंध चिकण सुपाऱ्या, लवंगा, वेलदोडे यांनाही अशाच रीतीने वर्ख चढवितात. हे विडे केवळ सन्मानासाठी व शोभेसाठी असतात, खाण्यासाठी नसतात. विडा सुकला की त्याची खरी चव गेली. ह्मणून विडे अगदी. आयत्या वेळी लावावे. पंगत वगैरे असली, तर तास दोन तास अगोदर लावून ठेवावे लागतात. ते सुकू नयेत ह्मणून एकाद्या परडीत ओल्या फडक्यांत गुंडाळून ठेवावे; पण एकावर एक दडपून उबू देऊ नयेत. विडा खाण्यांतले गुणदोष-विडा खाण्याने तोंडाची घाण जाऊन रंजन होतें, उत्तेजन येते, पचन होते, आणि शक्ति वाढते, असें वैद्यकग्रंथांतून सांगितलेले आढळते. पण हे गुण विड्याच्या परिमित सेवनाचे आहेत. अतिरिक्त सेवनाने उलट १ सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व पुण्याच्या शेतकी खात्याचे प्रिंसिपाल डॉ० हेरोल्ड मॅन यांनी विडयांतल्या द्रव्यांचे पृथक्करण करून पाहिल्यावर असें ठरविले आहे की, नियमित प्रमाणांत विडा खाणे सुद्धां शरिराला अपायकारक आहे. शरीराला गुण करणारे एकही द्रव्य त्यांत नाहीं, सगळीच अपाय करणारी आहेत. पण हे मत सर्वमान्य आहे असें नाहीं..