पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १४७ wwwm तोंडाला फोड येतात. ( तसे झाल्यास खोबरें किंवा बदामाचा गीर खावा ह्मणजे आगीचे शमन होतें.) लांबट जातीच्या पानांना रुंद जातीच्या पानांपेक्षां चुना अंमळ कमीच लागतो. पानाला चुना किती लावावा याचे नक्की प्रमाण सांगता येत नाही. साधारणपणे पानांच्या एक चतुर्थांश भागापासून अर्ध्यापर्यंत पातळ लेप करण्यास पुरे इतका चुना लावावा. पुरुषांपेक्षां बायकांना कमी, व त्यांच्यापेक्षा मुलांना चुना कमी लागतो. दिवसांतून पुष्कळ वेळां विडा खाणाराच्या विड्याला चुना कमी लागतो. ज्यास्त पाहिजे असल्यास खातां यावा ह्मणून पानांच्या लहान चिंचोक्याएवढ्या पट्ट्या घट्ट चुना भरून विड्याच्या डब्यांत ठेवाव्या. चुना पानांच्या पालथ्या बाजूस लावावयाचा असतो. त्याची एक पट्टी असली तर चुना त्याच्या मुळाकडे, एक पान असले तर मध्यावर, व दोन पाने असली तर अग्रभागाला चुना लावण्याची चाल आहे. पण ही चाल देशपरत्वे भिन्न भिन्न आहे. चुन्याच्या बरोबरीने कात पाहिजे. त्याची भुकटी असेल तर चुन्यावर ती भुरभुरून अधिक झाली असल्यास दुसऱ्या पानावरच्या चुन्याने टिपून घ्यावी, किंवा झटकून टाकावा. चुन्याच्या डबीत मात्र उडू देऊ नये. कात कमी झाला तर तो वरून खातां येतो. पण ज्यास्त झाल्यास विडा कडू होतो. इतर मसाला-वेलदोडे, बदाम, केशर वगैरे मसाला इच्छेप्रमाणे घालावा. विडा बांधणे-विडा बांधण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. जसेंविडी, हिंदुस्थानी वडा, दक्षिणी विडा, पट्टीचा विडा, गोविंद विडा. दरबारी विडा, इ०. विडी आणि पट्टी करण्याला थोडी चतुरता लागते.