पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ घरांतली कामें. करून घ्यावे. पानाला चुना लाविल्यावर मग कात वाढू लागावयाचे, किंवा कात घातल्यावर सुपारी शोधीत बसावयाचे, असें करूं नये. पानाला लावलेला चुना वाळण्यापूर्वी त्यावर कात पडला पाहिजे. नाहीतर विड्याचा स्वाद जातो. पाने ओली असल्यास फडक्याने अगोदर पुसावी. देठ असल्यास ते काढावे, अग्र तोडावें, शिरा जाड असल्यास सुरीने किंवा अडकित्त्याच्या पानाने काढून टाकाव्या. त्या जाड नसल्यास उगाच शास्त्राकरितां काढण्यांत वेळ घालवू नये. पानाच्या पट्ट्या लावाव. याच्या असल्यास सुलट बाजूने पान दुमडून मधली शिर काढावी; झणजे पानाचे बरोबर दोन तुकडे होतात. तीन तुकडे करावयाचे असतील, तर दोन बाजूचे दोन तुकडे काढून मधला भाग वेगळा करावा. पान तिखट, रुचकर व दळदार असले तर विड्याला अर्धे पान सुद्धां पुरतें. तशी नसली तर त्यांच्या आकाराच्या मानाने एक दोन किंवा ज्यास्त पाने लागतात. तीन पानांचा विडा लावीत नाहीत. दक्षिणेत बहुधा दोन पानांचा लावतात. पांच पानांचा विडा प्रशस्त मानतात. पण येवढ्या मोठ्या विड्यांत कात, चुना, सुपारी, वगैरेचें योग्य प्रमाण राहत नाही. त्यापेक्षां थोडया पानांचे अधिक विडे खाणे चांगलें. पानाला बोटानें चुना न लावतां काडीने लावणे चांगलें. बोटाने लावणे झाले तर त्याची गोळी घेऊन पानावर ठेवावी आणि अंगठ्याने ती पसरावी. चुना नवा, ताज्या कळ्यांचा केलेला असला, तर तो फार तीव्र असतो. तो पानाला बेताचा लागला तर ठीक आहे. ज्यास्त झाल्यास