पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. Amwand mon देण्याची चाल आहे. लग्नकार्याला आरंभ झाल्यापासून (देवक बसल्यापासून ) तो 'शुभलग्न सावधान' होऊन टाळी वाजेपर्यंत दरम्यानच्या पानसुपारीचे प्रसंगी सबंध सुपारीच देण्याची चाल आहे. या अवधीत मांडवांत सुपारी कातरण्याचा देखील प्रतिबंध असतो. कोणाला जपजाप्य, अनुष्ठान वगैरेची वरणी द्यावयाची असली,तर हातांत सबंध सुपारी देतात. सुपारी उंबरठ्यांत फोडणे अशुभ समजतात. लवंगा-या मलाका, अंबोयना वगैरे बेटांत होतात. सांबरी रंगाच्या, तेजस्वी आणि मोठ्या लवंगा चांगल्या असतात. फार काळ्या रंगाच्या व बारक्या लवंगा चांगल्या नसतात. लवंगांची फुले खात नाहीत. वेलदोडे-यांना एला, वेला, विलायची, वेलची, इ० अनेक नावे आहेत. वेलदोडे मलबार, कोचीन, मंगलोर, शिरसी ( कारवार) वगैरे मुलुखांत होतात. यांचे दोडे गोल व लांबट असे दोन त-हांचे असतात. त्यांतही कांहीं भरीव, कांही पोकळ, काही काळ्या दाण्यांचे, तर काही पिवळ्या रंगाचे असतात. दोडे मोठे व शुभ्र दिसावे ह्मणून कोणी त्यांवर चुन्याचे पुट देतात. जे वेलदोडे हिरव्या टरफलाचे, चुन्याचे पुट न दिलेले, भरीव, मोठे व काळ्या दाण्यांचे असतात ते चांगले समजावे. चांगल्या मोठ्या एका वेलदोड्यांत ६० पर्यंतसुद्धां दाणे निघतात. विड्याचे सर्व सामान पाहून नीटनेटके करून ठेवण्याचे काम रोजच्या नियमित कामांतच गोवून सायंकाळच्या केरवाऱ्याबरोबर करण्याचा नेम ठेवावा. जे ते जिन्नस ज्या त्या डब्यांत भरून ठेवावे. अगदी संपण्याची वाट पाहूं नये. विडा लावणे. विडा लावण्यास प्रारंभ करण्यापूर्वी त्याचे सगळे साहित्य सिद्ध १०