पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ घरांतली कामें. व वजनदार असेल, ती हलक्या प्रतीची समजावी, चिकण सुपारी फार महाग विकते. विड्यांत घालण्याला शुद्ध बरडा सुपारी चांगली असते. ती आडकित्याने, किंवा दुसऱ्या कशाने बारीक करतात. सुपारी कातरण्याच्या दोन तन्हा आहेत. एक तिचे बारीक पातळ कापे काढण व दसरी अष्टपैलू रवे रवे करणे. दक्षिणेत पहिली व उत्तर हिंदुस्थानांत दुसरी त-हा विशेष आहे. कोणतीही तन्हा असो, विड्याला जितकी बारीक कातरलेली सुपारी असेल तितकी चांगली. अगोदर कातरून ठेविलेल्या सुपारीपेक्षां विंडा करण्याचे वेळी ताजी कातरून घेतलेल्या सुपारीला चव अधिक असते. सुपारी कातरण्यांतही कित्येक लोक फार कुशलता दाखवितात. दोन चांगल्या मोठाल्या सुपाऱ्या दिल्या असतां त्या कातरून अशा फुगवितात, की येवढी, सुपारी शेपन्नास विड्यांना सहज पुरेल असे वाटते! . - कित्येक लोक सुवासिक पाण्यांत सुपारी भिजवून ती सुगंधित करतात. कोणी तिला पेपरमिंटांत भिजवितात. कातरलेली सुपारी फुलांत कांहीं वेळ घालून ठेविल्याने तिला फुलाचा वास लागतो. बरडा सुपारी फार खाल्ल्याने तोंड सोलतें. केव्हां केव्हां लागते ह्मणजे छातीत अडकून बसल्यासारखे होऊन माणसाचा जीव घाबरतो. चिकण सुपारी इतकी दोषकारक नसते. ती फार खाण्यांत आली तर मात्र कित्येकांना एखादा जुलाब होतो. सुपारी पूजेत गणपति, वरुण, इ. देवतांबद्दल मांडतात, विड्याबरोबर ती दान ह्मणूनही देतात. जांवई, व सोयरेधायरे भेटण्यास आले असता त्यांना निरोप देतांना व लग्न-मुंजीची अक्षत घेऊन येणाराला निरोप देतांना एक किंवा दोन संबंध सुपाऱ्या