पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० घरांतली कामें व दोऱ्या टाकण्यासाठी एक वेगळीच टोपली करावी आणि तीत त्या नेहमी टाकीत जाव्या. प्रकरण ३ रे. रांगोळी. . १ रांगोळी घालणे हे आपल्या लोकांत एक मंगल चिन्ह समजतात. नुसतें पोतेरे किंवा सडा घालून ठेवण्यापेक्षा त्यावर रांगोळी घालण्याने घरापुढच्या जागेला शोभाही येते, ह्मणून ही चाल पडली असावी. रांगोळी घालण्याची चाल बहुतेक हिंदुजातीत व पारशी लोकांत ही आहे. २ रांगोळी, शिरगोळे किंवा गारगोट्या भाजून व दळून करतात. चुनखडीची भुकटी ही या कामी उपयोगांत येते. कोणी लोक रांगोळी घातलेली बरेच दिवस टिकावी ह्मणून खडी पातळ करून तिची रांगोळीसारखी चित्रे व आकृति काढतात.जेथें रोज सडासंमार्जन व्हावयाचे, तेथे मात्र खडीची ही रांगोळी उपयोगाची नाही. कांहीं लोकांत कणिकेची रांगोळी घालण्याची चाल आहे, पण ती चांगली नाही. कारण, त्या पासून माशा, मुंग्या, चिलटे वगैरेंच्या वाढीला साह्य होऊन त्रास होण्याचा संभव आहे. हळदीचा, कुंकवाचा व क्वचित प्रसंगी गुलालाचा* ही या कामीं उपयोग करतात. निरनिराळ्या रंगांत रांगोळीची चित्रे काढावयाची असली झणजे या द्रव्यांचा चांगला उपयोग होतो.

  • आरारूट, खडी, बारीक रांगोळी किंवा पीठ यांत तांबडा रंग मिळवून व ती पाण्यांत घोटून वाळवून गुलाल तयार करतात. हिरवे, पिवळे, वगैरे दुसऱ्या रंगांचे गुलाल अशाच रीतीने केलेले असतात,