पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ३ रें. का-३ सडासंमार्जन झाल्यावर घराच्या मागल्या आणि पुढल्या दोन्ही दारांशी, निदान पुढल्या दाराशी तरी, तसेंच तुळसीवृंदावनापुढे आणि देवापुढे, रांगोळी घालण्याची चाल आहे. रांगोळी घालण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांतले मुख्य मुख्य येथे देतो: १ मंडले-स्वस्तिक, गोपद्म, चक्र इ० २ घराचे भाग- तोरण, दरवाजा, तुळसीवृंदावन, पर्वत, मंदि रा, शिखर इ० ३ फुलें-कमळ, सूर्यफूल, गुलाब, जाईचा मंडप इ० ४ फळे-खरबूज, अननस, नारळ वगैरे. मा ५ जनावरें-गाय, हत्ती, बैल, घोडा इ० ६ पक्षी-पोपट, मोर, हंस, बदक इ० ) ७ जलचर प्राणी-मासळी, कासव, शंख इ० ८ देवता-शिवलिंग, शालूका, सूर्य, चंद्र, तारका, नवग्रह इ० यांपैकी देवादिकांची रांगोळी फक्त देवघरांत, किंवा तुळसीवृंदावनापुढे घालणे योग्य आहे. इतर ठिकाणी घातल्यास तिच्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाय पडण्याचा संभव असतो. ह्मणून ती फारशी कोणी घालीत नाहीत. ४ रोज तीच ती रांगोळी घालू नये. नित्य नवीन प्रकारची घालावी. ह्मणजे आपणास पुष्कळ प्रकार आपोआप येऊ लागतात. सामान्यतः एकाच रंगांत रांगोळी घालण्याची चाल आहे. कित्येक बायका आपलें विशेष कौशल्य दाखविण्यासाठी रांगोळी घालून तींत निरनिराळे रंग भरतात. ५ रांगोळी काढतांना ती आपण जागेला शोभा आणण्यासाठी काढीत आहों ही गोष्ट ध्यानात ठेवावी. रांगोळीवरून आपल्या