पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २ रें. तून खाली रस्त्यांत केर फेंकू नये. त्यामुळे एक तर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर तो पडण्याचा संभव असतो, आणि दुसरी गोष्ट असें करण्याने तो केर वाऱ्याने उडून दुसऱ्याच्या घरांत जातो. त्यापेक्षा असा केर टोपलीत भरून ती टोपली दिवसांतून एकदां केव्हां तरी खाली नेऊन म्युनिसिपालिटीने ठेविलेल्या पेटीत ओतावी हे चांगले. सडकेवर किंवा रस्त्यांत अथवा लोकांच्या दाराशीं केर ओतूं नये. रस्त्यावर केर टाकणे हा गुन्हा आहे, आणि आपल्या थोड्याशा आळसामुळे दुसऱ्याच्या आरोग्याला अपाय होईल अशी एखादी गोष्ट करणे हे पाप आहे. शिवाय आपण जसे दुसऱ्याच्या दाराशी केर टाकण्यास पाहतो, तसे दुसरेही आपल्या दाराशी केर टाकू लागले तर आपणांस काय वाटेल याचाही विचार करावा. १९ केव्हाही पाहिल्याशिवाय केर टाकू नये. कारण, घरांतली एखादी बारीक सारीक वस्तु केरांत जाण्याचा संभव असतो. झाडतांना भुईवर कागद वगैरे पडलेले दिसले तर ते वाचून पाहिल्याशिवाय किंवा कोणाला दाखविल्याशिवाय रद्दी समजून टाकू नये. कागदाचे तुकडे वगैरे केरांत टाकण्यापेक्षा जाळून टाकलेले बरे. २० रद्दी झालेली वर्तमानपत्रे आणि वेष्टनाचे कागद उचलून त्याचे पुडके बांधून ठेवावे. हे कागद पुष्कळ वेळां उपयोगी पडतात, किंवा पुष्कळ जमल्यावर विकतां येतात. __२१ कोऱ्या किंवा स्वच्छ कापडाच्या चिंध्या मुलांचे चेंडू किंवा मुलींसाठी भावल्या करण्याच्या उपयोगी पडतात.मळालेल्या चिंध्यांचाही काकडा करण्याचे किंवा चूल वगैरे पेटविण्याचे कामी उपयोग होतो. दोऱ्यांचे तुकडे तर नेहमी लागतात. यासाठी अशा चिंध्या