पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १४३ सुपारी. सुपारीची झाडें पूर्व, पश्चिम आणि दक्षिण तिन्ही समुद्रकिनाऱ्यांवर पुष्कळ होतात. ती ४० पासून ६० फुटांपर्यंत उंच सोटासारखी वाढत जातात. त्याच्या शेंड्याला फांद्यांचा झुपका असतो. त्या फांद्यांच्या मुळांस फळांचे घड लागतात. प्रत्येक घडांत १०० पासून २०० पर्यंत सुपाऱ्या असतात. त्यांचे वर्षांतून दोन बहर येतात. एक अश्विनांत पुरा होतो व दुसरा चैत्रांत. सुपारीला वरून नारळासारखें टणक कवच असते. ते असतांना तिला पोफळ ह्मणतात. ही कवची हाताने सोलून काढता येते. पोफळाची झणजे ओली सुपारी रुचीला फार तुरट लागते. सुपारीत मोहाची ह्मणून एक जात आहे. ती नरम असून रुचीला खोबऱ्यासारखी लागते. पण हिचे पीक फार थोडे येते. यामुळे ती भहाग विकते. सुपारी मूळ स्वरूपांत असते तिला बरडा ह्मणतात. ती ओलीच शिजवून चेपून वाळविली ह्मणजे चिकण सुपारी होते. या शिवाय सुकलेली सुपारी उकलून किंवा तिला बिबव्याचे पुट देऊनही एक प्रकारची सुपारी दक्षिणेत तयार करीत असतात.. जी बरडा सुपारी मोठी, चांगली फुगलेली, तेजस्वी, पांढुरक्या रंगावर, वजनदार असेल, जिच्या मुळाशी भोंक पडलेले नसेल, सुकी खणखणीत असेल, आणि जी फोडली असतां आंत पांढरी स्वच्छ निघेल. ती चांगली समजावी. जी चिकण सुपारी वरून भुऱ्या रंगाची, निस्तेज, सुरकुत्या पडलेली, फारच चेपलेली, बसकी, चपटी आणि आंत दुधाच्या सायीसारखी पांढरी असेल ती चांगली. जी काळी, तेजस्वी, फुगीर,