पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ घरांतली कामें. सारखा गुणहीन असतो; २ सत्त्वयुक्त असतो. रुचीने हे प्रकार ओळखतां येतात. काताला सुवास देण्याची चाल आहे. कित्येक लोक वासाचे पाण्यांत काताची पूड घालून ठेवतात, व ते पाणीच विडा करतांना पानांस लावतात. कोणी हे पाणी सुकू देऊन त्याच्या वड्या करून ठेवतात. कोणी काताच्या पुडीला अत्तराचा हात लावून गोळ्या बांधतात. कोणी केवड्याच्या कातगोळ्या करतात. या करण्याची रीत अशी आहे-काताची बारीक वस्त्रगाळ पूड करून ती पाण्यांत घट्ट भिजवावी. मग एक मोठे केवड्याचे कणीस घेऊन त्याच्या वरली मोठाली हिरवी पाने काढून टाकावी. दांडयावरले तंतुगुच्छ तसेच राहू द्यावे. पाने देनढी काढून ती आंतून स्वच्छ पुसावी. नंतर प्रत्येक पानाच्या दलावर ताचा थर घालून दुसरें पान त्यावर दाबून बसवावें; आणि अशी सर्व पाने तयार करून एकावर एक रचून त्यांची रास करावी व पूर्वी काढून ठेविलेल्या पानांच्या सोपटाने ही रास आवळून वरला कात सुरीने काढून त्याच्या गोळ्या कराव्या. । कातगोळ्यांचे प्रकार त्यांच्यांतल्या द्रव्यांच्या मानाने पुष्कळ आहेत. उत्तम कातगोळ्यांचे एक दोन प्रकार येथे देतो. । पहिला प्रकार-कात ५ तोळे, जायफळ, कंकोळ, कापूर, लवंगा ही प्रत्येकी अडीच मासे, व कस्तुरी १ गुंज, यांचे चूर्ण करून आंब्याच्या चिकांत खलून ३ गुंजांच्या प्रमाणाच्या गोळ्या कराव्या. दसरा प्रकार-कात ५ तोळे, चंदन, वेलदोडे, जायफळ, कापूर, लवंग व कंकोळ ही प्रत्येकी २ मासे, यांचे चूर्ण करून तें गुलाब, कस्तुरी, केवडा वगैरे सुवासिक पाण्यांत मळून अगर अत्तराचा हात लावून ३ गुंजांच्या प्रमाणाच्या गोळ्या कराव्या.