पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १४१ ध्यावा, आणि गाळलेल्या चुन्याचे मडके तोंड बांधून दोनतीन दिवस न हालवितां तसेच राहू द्यावें, झणजे चुन्याचा चक्का खाली बसून वर निवळ येईल. ही निवळही तशीच जिरू द्यावी. जिरून राहील ती एखाद्या बाटलीत गाळून भरावी. कारण, ही निवळ उपयोगाची असते. ज्यांना नुसतें दूध पचत नाही, त्यांना ही निवळ घालून दिलेले दूध पचते. चुना वाळू देऊ नये. त्यांत वरचेवर पाणी घालीत जावें. वाळल्याने चुना निर्जीव होतो. तसेच त्यावर उजेड पडू देऊ नये. त्याने तो विरतो व फाटतो. ह्मणून चुन्याचे मडके तोंडावर झाकण ठेवून अंधाराचे जागी एखाद्या कोनाड्यांत ठेवावें. . चुना पाहिजे असेल तेव्हां एखाद्या काडीने मडक्यांतून काढून चुनाळ्यांत किंवा डबीत भरावा. कोणी शौकी लोक चुन्याला सुवास लागावा ह्मणून त्यावर गुलाब-पाण्याने किंवा केवड्याच्या पानाने भिजविलेली फडक्याची पट्टी ठेवतात; कोणी त्यांत रंगासाठी केशराच्या काड्याही टाकतात. ___पानसुपारी खाणारांना चुना दुसऱ्याकडून मागून आणण्यांत अप्रतिष्टा वाटत नाही, पण हे चांगले नाही. चुना करण्याला फारसा पैसा किंवा श्रम लागत नाही. मात्र तो खराब होऊ नये ह्मणून थोडीशी सावधगिरी ठेवावी लागते. चुना फार खाण्यांत येऊ नये. तो अपाय करतो. .कात-हा कित्येक विशेष प्रकारच्या झाडांपासून काढतात. चांगला कात हलका व जांभळ्या रंगावर असतो. जो वाटला असतां त्यांतून बारीक वाळ निघत नाही, त्याच काताला धुऊन शुद्ध करून त्याचा सत्त्वांश काढतात. त्याला पांढरा कात ह्मणतात. हा किंचित् मोतिया रंगावर असतो. याच्या दोन जाती आहेत-१ शुद्ध माती