पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. । (७) पाने घरी आणिल्यावर ती स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावी. बरोबर चुना आला असल्यास व तो चांगला असल्यास चुनाळ्यांत भरावा, नाही तर फेंकून द्यावा. चुन्याचे पान इतर पानांत मिसळू नये. र चुना. प्रकार-जुन्या संस्कृत ग्रंथांतून चुन्याचे आठ प्रकार सांगितले आहेत. पण त्यांतले दोनच ह्मणजे दगडी आणि चुनकळीचा असे सध्या प्रचारांत आहेत. दगडीचुना हा संगमरवरी दगडासारखे दगड आहेत त्यांचे पीठ करून त्यांत पाणी घातल्याने तयार होतो. चुनकळीचा चुना जमिनीत चुनखडीचे दगड असतात ते खणून काढून व कोळशांच्या भट्टीत भाजून तयार केलेला असतो. चुनखडी भाजल्याने चांगली फुलते. ज्या चांगल्या फुलल्या असतील त्याच कळ्या चुन्यासाठी निवडून घेतात. चुना आयता बाजारांतून आणण्यापेक्षा चुनकळ्या घरी आणून करावा हे चांगले. चुनकळ्यांचा चुना करण्याची रीत अगदी सोपी आहे. चुनकळ्या पाण्यात विरघळतात. यासाठी या कळ्या एखाद्या स्वच्छ मडक्यांत घालून त्यांवर दुरून पाणी ओतावे व दांडयाने ढवळून सारखें करावें. पाणी ओतल्याबरोबर त्यांत उष्णता उप्तन्न होते. यासाठी तो काही वेळ तसाच राहूं देऊन मग निवाल्यावर फडक्यांत गाळून १ अर्जुनोऽर्कश्च कुटजो मौक्तिकं च शिलाभवं । कारंजं स्फाटिकं शुक्तेश्वर्णमष्टविधं मतम् ॥ ह्मणजे अर्जुन. अर्क, कुडा आणि करंज हे चार वृक्ष, दगड आणि स्फटिक या दोन शिला व शिंप आणि मोती हे दोन कृमिज अशा आठ पदार्थांचा चुना करीत.