पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १३९ aaaaaaaaaaaaaaaaaaamraphy भिजवून त्यांत गुंडाळून ठेवावी. फडके सुकेल तसतसे पुनः पुनः त्यावर पाणी घालीत जावे. पाने दडपून ठेवू नयेत. त्याने ती उबतात. पाने पानमळ्यांतून चांगली ताजी पाडाची आणण्याची सोय सगळ्यांनाच नसते. त्यांना ती बाजारांतून तांबोळ्याच्या दुकानांतून घ्यावी लागतात. पुष्कळ तांबोळी सर्व प्रकारच्या पानांची भेसळ करून त्यांच्या गड्या लावून ठेवतात. त्या लावतांना वरचे पान तेवढें चांगले लावून आंत सगळा गाळ भरतात, किंवा अन्यत-हेनें लबाडी करून वाईट माल गि-हाइकाच्या पदरी घालतात. यासाठी पाने विश्वासावर न घेतां ती स्वतः नीट पाहून घ्यावी. यासंबंधाने पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या (१) पाने होतां होईल तो देठाची घ्यावी. देवापुढे विडा ठेवावयाचा असतो, त्याला तर देठाचंच पान लागते. पानांची जात पाहून ओळखतां न आली तर तुकडा मोडून चाखून पहावा. (२) एकाच जातीची सगळी पाने घ्यावी. STERE (३ ) पाने नेहमी मिळण्यासारखी असतील तर पुष्कळ दिवसांचा संग्रह एकदम करून ठेवू नये. (४) तांबोळ्याने लाविलेल्या चळतींतून स्वतः चांगली पाने निवडून घ्यावी. (५) पुष्कळ पाने एकदम घ्यावयाची असली आणि ठेवून खर्चावयाची असतील तर ढोल्या विसकटलेल्या न घेतां बांधलेल्या असतील त्याच घ्याव्या. (६) पाने हातांत खुली आणूं नयेत. ती दुसऱ्या पानाच्या वेष्टनांत बांधून आणावी.