पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ घरांतली कामें. 1 पान चांगले कोणते व त्याच्या अंगी कोणते गुण असावेत, हे सांगणे कठीण आहे. कोणाला पान मऊ असलेले आवडते, तर कोणी ह्मणतात की, असले निःसत्व पान बकऱ्यांच्याच खाण्याच्या उपयोगाचे आहे ! यांच्या दृष्टीने उत्तम पान ह्मणजे जें फेंकून मारले असतां तुकडे तुकडे होतात तें होय. तथापि पानांचा उत्तमपणा झणजे साधारणपणे असा आहे की, तें दळदार असून, त्याच्या शिरा जाड व वर निघालेल्या नसाव्या. वर्ण हिरवा काळसर नसावा; मध्ये खळगा असू नये; त्याला वाईट वास, अति तीक्ष्णता किंवा चरबटपणा नसावा. पानांची निगा राखण्यासंबंधाने पुढील गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेतः (१) पानाचे देंठ कायम आहे तोपर्यंत ते पुष्कळ दिवस टिकते. पान सडूं लागण्याला प्रारंभ देठाकडून होतो. सडूं लागलेला भाग कातरीने कापून टाकला, तर राहिलेला भाग आणखी कांहीं दिवस टिकतो. कापण्याचे काम बोटांनी मात्र करूं नये. (२) लांबट जातीच्या पानाला पाणी अगदी सोसत नाही. ते लागले तर ती नासू लागतात. ह्मणून ती नुसतीच केळीच्या किंवा दुसऱ्या कसल्या तरी पानांत किंवा नरमशा रोगणाच्या कापडांत गुंडाळून ठेविली किंवा तशीच डब्यांत ठेविली, तर नासत नाहीत. मात्र डब्याचे झाकण त्यांना दडपून टाकण्यासारखे लावू नये. उलट रुंद पानाच्या जातीला पाणी सदोदित पाहिजे. ते मिळाले नाहीं तर पाने म्लान होतात व त्यांची रुचि जाते. ह्मणून अशा जातीची पाने पाण्यात घालून ठेवावी, किंवा फडके पाण्याने चांगले तरीर १ पर्ण पुराणमकटु क्षुल्लकं तनुपांडुरम् । विशेषाद्गुणवत् ज्ञेयमन्यद्धीनगुणं मतम् ॥