पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. १३७ wwwwwww वा . केशर, कस्तुरी, शीतळचिनी, कापुर, पेपरमिंट, गुलाबपाणी किंवा केवड्याचे पाणी, यांचा उपयोग इच्छेवर अवलंबून आहे. विड्याची पानें-यांना नागवेलीची पाने असे दुसरें नांव आहे. ही हिंदुस्थानांत बहुतेक सर्व प्रांतांतून होतात. नागवेलीच्या पानांचे मळे असतात. त्यांना पानमळे किंवा पानड्या ह्मणतात. या पानाला सूर्याचे ऊन अगदी खपत नाही. ह्मणून हे मळे चोहींबाजूंनी आच्छादावे लागतात. नागवेलींना पाने बाराही महिने येतात. तरी उन्हाळ्याच्या आरंभी त्यांचा विशेष बहर असतो. एकादा पाऊस पडला ह्मणजे ती अंमळ दळ धरूं लागतात, आणि खाण्यासारखी होतात. ह्मणून नागपंचमी झाली की नवीं पाने खाण्यास सुरुवात करण्याचा जुना रिवाज आहे. पानांच्या जाती-अनेक आहेत. तरी त्यांतल्या ठळक जाती येणेप्रमाणे आहेत १ लांबट पानाची-हिचे दळ कोमल, शिरा बारीक आणि दबलेल्या, वर्ण पांढरा आणि रुचि स्वादिष्ट असते. उत्तर हिंदुस्थानांतली कपुरी, महाराष्ट्रांतली दक्षिणी, गुजराथेतली गंगेरी, काशीची मघई, व मध्यप्रांतांतली रामटेकची, अशा याच्या पांच ठळक पोटजाति आहेत. । २ रुंद पानाची—हिचे दळ जाड, शिरा वर निघालेल्या, वर्ण पिवळा किंवा दूर्वादलासारखा पांढुरका, रुचि तुरट, तिखट, किंवा कडू असते. हिच्यांत माळवी किंवा चोराणी, मंद्राजी (मद्रासी) व बंगाली अशा तीन पोट जाती आहेत. मद्रासी व चोराणी पानांतला भेद पुष्कळ वेळां ओळखतां येत नाही. स्वादावरून मात्र मद्रासी पान तेव्हांच ओळखता येते. मद्रासी पान खाल्ले झणजे ढेकूण चिरडल्यासारखा वास येतो.