पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें १५ गच्ची व दगडाची किंवा चुन्याची फरशी केरसुणीने झाडल्यानंतर शक्य असल्यास पाण्याने साफ धुऊन टाकावी. पाणी जाण्यास वाट नसेल तर जाड फडके ओले करून त्याने घासून स्वच्छ करावी. १६ घरांतल्या मोऱ्या, न्हाणी, व परस यांतला केरकचरा अगोदर काढून टाकून नंतर त्या केरसुणीने घाण नाहीशी होईपर्यंत घासून घासून धुवाव्या. इतकेंही करून घाण आली तर थोडे फेनाईल पाण्यात मिसळून ते पाणी मोरीत ओतावे किंवा कार्बालिक आसिड नांवाची चुनखडी मिसळलेली एक भुकटी मिळते, ती घाणीच्या जागी भुरभुरावी. मोऱ्या धुण्याची केरसुणी दुसऱ्या कामांत घेऊ नये. १७ घराच्या आतील भागांतल्या शेतखान्यांतून जेथें भंग्याचा संचार होण्यासारखा नसेल तेथील केर, जाळी, दिव्याची काजळी, विड्यांचे व आगकाड्यांचे तुकडे वगैरे स्नानाचे अगोदर काढून ती जागा स्वच्छ करावी. हे काम आठचार दिवसांनी करावें. १८ केर काढल्यावर तो कोपऱ्यांतून जेथे तेथे सांठवून ठेवू नये. त्यापासून चिलटें, पिसा, माशा वगैरे वाढून ती रोग पसरवितात. उंदीर, विंचू, ढेकूण, आळ्या वगैरे प्राण्यांनाही त्यांत लपण्यास सांपडते. ह्मणून केर काढल्यावर तो लागलीच बाहेर टाकावा. पण तो दारासमोर रस्त्यावर टाकू नये. म्युनिसिपालिटीने यासाठी महाम जागोजाग ठेविलेल्या पेट्यांत टाकावा. माडीवर राहणाऱ्यांनी खिडकी १ लहान गांवांतून व खेड्यांतून जागजागी केराचा ढीग करण्याची चाल पूर्वी असे व अजूनही कित्येक गांवी आहे. या ढिगाला उकिरडा ह्मणतात. या उकिरड्याचा खताकडे उपयोग करतात. खतासाठी असा उकिरडा ठेवण्याची जरूरीच असली तर तो निदान गांवाच्या बाहेर ठेवावा; आंत ठेवू नये.