पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामे. गोल खरबुजी असतात. मराठेशाहीत नाशिक, झांशी आणि सागर येथें ही तबके फार सुंदर व डौलदार बनत असत. आजकाल ही तबके बारीक पत्र्याची ठशांनी वर फुलें-पाने वगैरे उठविलेली मिळतात. डबा-- तीस चाळीस वर्षांपूर्वी पानसुपारीचे पितळी डबे प्रचारांत आले. या डब्यांत खालच्या पोकळ भागांत पाने व वरच्या पाळ्यांत निरनिराळ्या खणांतून सुपारी, कात, लवंगा, वेलदोडे वगैरे, वरील तबकडीत चुना आणि त्यावर अडकित्ता ठेवण्याची सोय असते. हे डबे आतां मागे पडले आहेत. पानदान–हें पाने ठेवण्यासाठी गोल किंवा एका बाजूला रुंदगोल व पुढे निमुळते होत गेलेलें असें विड्याच्या पानाच्या आकाराचे असते. त्याला खाली पाय असून वर शोभेसाठी राघू, मैना वगैरे चित्रे बसविली असतात. या पानदानांत एका तबकडीला लहान लहान भोंके ठेवून त्यांत बुटकुलीवजा लहान लहान झांकणाची भांडी कात, चुना वगैरे सामान ठेवण्यासाठी घातलेली असतात. अडकित्ता आणि पाने वरील पोकळीत ठेवतात. हा पानदानाचा रिवाज मुसलमानांत व त्यांच्या पद्धतीने राहणारांत विशेष आहे. किश्ती आणि तशतरी–ही एक प्रकारची तबकेंच आहेत. किश्तीचा घाट नावेसारखा दीर्घ वर्तुळ असून, त्या लहान मोठ्या आकृतीच्या असतात. तशतरी गोल असते. अलीकडे अशा प्रकारची तबकें सुंदर रोगण व रंगीत चित्रे काढलेली जर्मनींतून येऊ लागली आहेत. ही स्वस्तही मिळाल्यामुळे त्यांचा खप मोठा आहे. .टे-से इंग्रजी त-हेच्या तबकाचे नांव आहे. जेथे इंग्रजी फ्याशनचा प्रचार जास्त आहे, तेथें तबकाऐवजी ट्रेचा उपयोग विशेष करण्यांत येतो.