पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ बें. थैली, चंची, बटवा-यांतूनही बिडयांचे सामान पूर्वी ठेवीत असत. थैली कापडाची निरनिराळ्या खणांची असे. जेव्हां मुलांच्या हाती पानसुपारी पडूं नये अशी मोठ्यांची व आपलें पानसुपारी खाणे वडील माणसास कळू नये अशी मुलांची मर्यादा असे. त्याकाळी थैली फार उपयोगाची असे. आतां थैलीची सुधारलेली दोन रूपें दिसतात. एक दक्षिणेत चंची हे, व दुसरे उत्तरेस बटवा हे. चंची व बटवा ही निरनिराळ्या प्रकारची चित्रविचित्र रंगांची व नानाप्रकारे केलेली मिळतात. चुनाळे-हीं कैरी, चक्री, लिंबू , खरबूज यांच्या व इतर कित्येक सुंदर आकृतींची आणि घाटांची असत. ही जाड असून त्यांच्यांत ठेविलेला चुना सहा सहा महिने वाळत नसे असे सांगतात. पण ही चुनाळी महाग पडत व त्यांची तोंडे लहान असल्यामुळे दरवेळी चुना कोरीत बसण्याचा त्रास पडे. ह्मणून त्यांच्याऐवजी लहान लहान डव्या प्रचारांत आल्या. या कातदाणी-हिचे दोन प्रकार असत. एक गोल आकाराची. दोन पुडांची, झाकणाची असून एका पुडाला एके जागी चाळणीसारखी चारसहा लहान लहान भोके पाडलेली असत. दुसरें पूड त्यावर आच्छादनासारखें असे. ते मळसूत्राने त्या भोंकांच्या वरून मागेपुढे सरकवितां येत असे. या त-हेच्या कातदाण्या अजूनही कोठे कोठे दिसतात. दुसरी एक कातदाणी उंच कोठीवजा असे. तिच्या झांकणाला मध्यभागी भोके पाडून त्यावर तेथेच फिरतें झांकण बसविलेले असे. या त-हेच्या कातदाण्या हल्लीही कोठे कोठे आहेत. पानपुडा--हा बांबूचा केलेला असतो. शोकी लोक त्यावर बनात व गोटाही लावतात. पूर्वी पितळेची पानपुडे असत. ती