पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें. स्वारीत हिलालांचा व पादचारी मिरवणुकीत मशालीचा उपयोग होतो. पूर्वी मशाली बरोबर चालविणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जात असे. मशाली धरण्याचे काम न्हाव्याचे असे. अजूनही कित्येक ठिकाणी ही मशालीची चाल आहे. ही चाल महाभारताच्याही पूर्वीची दिसते. महाभारतांत मशालींचा उल्लेख आहे. १० गुबारे—मशाल उलटी करून तिच्यावर कागदाचा उंच घुमट लाविला असतो. मशाल पेटविली झणजे तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या ग्यास ( वायु ) च्या जोरानें तो घुमट उंच उडत जातो व मोठी मौज दिसते. मशाल विझली ह्मणजे तो आपोआप खाली उतरत येऊन कोठे तरी पडतो. असे गुबारे अजूनही दिवाळीचे वेळी व इतर आनंदोत्सवाचे वेळी दारूकामाबरोबर पुष्कळ लोक सोडतात. ११ ग्यासचे व विजेचे दिवे-ग्यासचे दिवे निघून पुष्कळ वर्षे झाली. विजेचे दिवे अलीकडे प्रचारांत आले आहेत. हे दोन्ही दिवे यंत्रानेच होणारे असून त्यांत तेलवातींची जरूरी नसते. किटसनचा दिवा हा एक प्रकारचा ग्यासचाच दिवा आहे. त्यांची कृति वगैरे शास्त्रीय विषयावरील पुस्तकांतूनच समजून घेतली पाहिजे. प्रकरण १४ वें. विड्याचे सामानाची व्यवस्था. __विड्याचे सर्व सामान एके जागी ठेवण्यासाठी तबक किंवा एक विशेष प्रकारचा डबा असतो. तबक-यांत सुपारी, कात, चुना वगैरे ठेवण्यासाठी लहानमोठ्या डव्या, आडकित्ता, आणि पानपूड ठेविलेले असते. या तबकाचे कांठ १ चिनी लोकांत ग्यासचे दिवे फार जुन्या काळापासून माहीत आहेत.