पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ घरांतली कामें. anwwwwwwwwwwwwwwwwwwww त्यांवर पंत्या ठेवून लाविल्या झणजे दिव्यांच्या झाडाची शोभा त्याला येते. ही दीपमाळ उत्सवप्रसंगी फक्त लावतात. ४ आकाशदिवा-घराच्या उंच भागावर एखाद्या बांबूला कागदाचा कंदील लटकावतात, त्याला आकाशदिवा ह्मणतात. दिवाळीत व कार्तिक महिन्यांत हे दिवे अद्यापही मुलें हौसेने लावतात. पूर्वी पहाटेस कार्तिक स्नानाला वृद्ध बाया जात असत, त्यावेळी त्यांना या दिव्यांच्या उजेडापासून काही मदत मिळे. ५ सभादीप-श्रावणीला व इतर कित्येक धार्मिक कृत्यांचे वेळी कणिकेचा दिवा करून त्यांत तेलवात घालून हा दिवा लावतात, आणि सुवासिनी स्त्रिया तो ब्राह्मणांस देतात. या दिव्यांच्या कणिकेंत थोडी हळद घालतात. हा दिवा विझवावयाचा नसतो. ६ उकडीचे दिवे-दिव्याच्या अवसेला कणिकेंत गूळ साखर घालून पंतीच्या आकाराचे करून ते उकडतात, आणि दिव्याला त्यांचा नैवेद्य दाखवून मग तो प्रसाद ह्मणून खातात. ७ पुरणाचे दिवे-कोंकणस्थ ब्राह्मणांत बोडणाचे वेळी हे करतात. १८ लक्षवाती-देवापुढे लक्ष दिवे लावण्याची ऐपत नसते. ह्मणून बायका लक्ष दिव्यांच्या ऐवजी लक्ष वाती करून, त्या त्रिपुरी पौर्णिमेला तूप घालून शंकरापुढे लावतात. अलीकडे ही चाल बहुतेक मोडली आहे. - ९हिलाल आणि मशाल-मोठ्या झगझगीत प्रकाशाची जुन्या काळची साधने तीनच दिसतात- १ सरक्यांचे दिवे, २.हिलाल, आणि ३ मशाल. कोंकणांत मशालीच्या जागी खोबऱ्याच्या वाट्या जाळतात. मशालीचा दांडा आखुड व हिलालाचा लांब असतो. दोन्हींत दांड्याला फडकी गुंडाळून ती तेलाने पेटवितात. उंच