पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. १३१ सोवळी माणसे मात्र तिला शिवत नाहीत. मेणबत्त्या चरबीसारख्या अस्पृश्य पदार्थाच्या केल्या जात असतांही, त्यांचा सोवळ्यांत सुद्धा इतका लवकर प्रवेश होण्याची कारणे त्यांच्या अंगचे गुण व सौंदर्य ही होत. दिव्यांचे विशेष प्रकार-वर सांगितलेले दिव्यांचे सामान्य प्रकार झाले. यांशिवाय त्यांचे विशेष प्रकार आहेत. ते असे: १ अखंडदीप-काही लोकांच्या घरी नवरात्रांत देवांजवळ अहोरात्र समई जळत ठेवण्याची चाल असते. ही जागेवरून हलवावयाची नसते. तसेंच वातही बदलावयाची नसते. ही समई जागचे जागी दिव्याला धक्का न लागतां व ज्योत जाऊ न देतां पुसण्यास हरकत नसते. न पुसली तर तेलाचा गाळ, व चिकटा समईत राहून खाली काजळ व कोळीव पडलेले, व तेल गळालेले, तसेंच राहून सगळा ओंगळपणा माजेल. देवाजवळ तरी असा ओंगळपणा कामाचा नाही. यासाठी हा दिवा व त्याचे ताट ही युक्तीने पुसावी. . २ नंदादीप-कांही जुन्या देवळांतून देवाजवळ एक किंवा दोन मोठाल्या उंच समया सारख्या अहोरात्र जळत ठेविलेल्या असतात; याला नंदादीप ह्मणतात. या दिव्यांत ज्योत अखंड राहावी येवढाच नियम असतो. समई बदलणे, दिवा जागेवरून हलविणे वगैरे संबंधाने विशेष नियम नसतो. - ३ दीपमाळ-कांहीं देवालयांतून लांकडी किंवा पक्की बांधलेले दीपस्तंभ असतात. त्यांवर पायऱ्यांसारख्या जागा केलेल्या असून, १ हिंदु लोकांची गुणग्राहकता स्पृश्यास्पृश्य दोषांच्या विचाराने निगडित नसल्याची आणखी पुष्कळ उदाहरणे देतां येतील. उदा०-हस्तिदंत, वाघनखें, गाईच्या केसांच्या चवन्या, मृगाजिन, कस्तुरी, पोंवळी, मोत्यें, रेशीम, सांबरशिंग इ०. वस्तु त्यांच्या सोवळयांत खुशाल चालतात.