पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- घरांतली कामें. wwwwwwwwwwwwww मेणबत्ती जळतांना तिच्यांतच तेलाची वाटी ज्योतीच्या खाली तयार होत असते ह्मणून वर सांगितलेच आहे. अर्थात् मेणबत्तीला निराळे तेलपात्र लागत नाही. पण मेणबत्ती उभी ठेवण्याला काही आधार लागतो. याला शमादान अथवा शामदान ह्मणतात. हे धातूचें किंवा चिनी मातीचे केलेले असते. यावर काचेची हंडी किंवा गलास घातल्याने मेणबत्तीचे वाऱ्यापासून रक्षण होते व तिचे मेण एकाच बाजूने जळत नाही. अलीकडे राकेल तेल निघाल्यापासून मेणबत्त्या काहीशा मागे पडल्या आहेत. तथापि अजून श्रीमंतांच्या येथे हंड्या, झुंबरे, शामदाने वगैरे क्वचित् दिसतात.. 1. मेणबत्ती एकाच बाजूने जळू नये व तिचे मेण वितळून खाली वाहून फुकट जाऊं नये शून एका पोकळ दांड्यांत स्प्रिंग घालून तिच्यावर बेताची मेणबत्ती दाबून बसवितात. या दांड्याचे तोंड असें केलें असतें की मेणाला उष्णता तर पोचावी, पण ज्योत प्रत्यक्ष लागू नये. दांड्यांतली मेणबत्ती वरून जसजशी जळत जाते, तसतशी खालच्या स्प्रिंगच्या जोराने ती हळूहळू आपोआप वर येते. या युक्तीने मेण अगदी फुकट जात नाही व मेणबत्ती अधिक वेळ पुरते. या दांड्याला खाली रुंद बैठक असून, वर काचेचा लहान ग्लोब घातलेला असतो. याला मेणबत्तीचा स्टयांड किंवा एका ह्मणतात. ____ मेणबत्तीसारखा थंड, संथपणाने जळणारा, व दृष्टीला प्रसन्नता देणारा दुसरा दिवाच नाही. त्याचे काजळ पडत नाही, धूर पसरत नाही व घाण येत नाही. मेणबत्ती सहज हातांत धरून वाटेल तिकडे नेता येते. तिच्यांत दुर्गुण असा एकही नाही. मेणबत्तीचा आतां सोवळ्यांतही प्रवेश झालेला दिसतो. देवाजबळ व भोजनसमारंभांत ती निःशंकपणे लावतात. क्वचित पार