पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. १२९ असत. पण आतां तो प्रचार विरळ आहे. मेणबत्त्यांचा सर्व पुरवठा युरोप व अमेरिका यांतूनच बहुधा होत असतो.अमदाबाद येथे व आणखी एक दोन ठिकाणी मेणबत्त्या करण्याचे कारखाने अलीकडे निघाले आहेत. पण तेथील मेणबत्त्या ठिसूळ असतात, आणि त्यांचे मेण व पाराफिन जपानांतून किंवा बाहेरील देशांतून आणिलेले असते. ब्रह्मदेशांत राकेल निघाल्यापासून तिकडे पाराफिनच्या मेणबत्त्या होऊ लागल्या आहेत. सहासहा मेणबत्त्यांचा एकेक पुडा असे पुडे घातलेल्या पेट्या बाजारांत मिळतात. त्या पुड्यांवर व पेट्यांवर कारखानदाराचे नांव व खूण असते. त्यावरून मालाचा गुण ओळखावा लागतो. यांत लबाड व्यापाऱ्यांना फसवेगिरी करण्याला सांपडते. ह्मणून केवळ वरच्या भपक्यावर न जातां एखादी मेणबत्ती प्रत्यक्ष जाळून खात्री करून घ्यावी. 1. मेणबत्त्या आकाराने जाड, बारीक, लहान मोठ्या, व निरनिराळ्या रंगांच्या मिळतात. पण तिचा उत्तमपणा जो आहे तो, ती ज्या द्रव्याची केली असेल त्यावर, आणि करण्याच्या कृतीच्या चांगुलपणावर, आहे. चांगल्या मेणबत्तीचे साधारण लक्षण ह्मणजे तिची वात वरपासून खालपर्यंत सारखी मधोमध असली पाहिजे. ती कलती असली तर एकाच बाजूचे मेण ज्यास्त वितळून फुकट जाईल. तिचे मेण सर्व ऋतूंत सारखें टणक राहिले पाहिजे. तें उन्हाळ्यांत पातळ होऊ नये, व तिचे मेण पांढरें स्वच्छ असून, ती जाड असावी. १ जगन्नाथ, व मेवाडांतील श्रीनाथजी यांच्यासारख्या जुन्या देवालयांतून अशा मेणबत्त्या अद्यापही करतात, आणि वापरतात. या दिसण्यांत पिवळ्या आणि साधारणपणे खडबडीत असतात. त्या केवळ हातांत धरून इकडे तिकडे नेण्याच्या कामी येतात.