पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ घरांतली कामें. सगळ्या वातीला बेताने चोपडणे आणि वात सरळ उभी राहील असे करणे भाग पडते. आपणं नेहमी पाहतों की मेणबत्ती पेटविल्याबरोबर ती चांगली जळत नाही. तिची ज्योत अगोदर मंद असते, व अमंळशाने ती आपोआप वाढून चांगला प्रकाश पडतो. याचे कारण हेच की मेण घट्ट असतें तें वितळून वातीच्या रंध्रांतून वर चढून येईपर्यंत त्याचा पुरवठा मिळत नाही. तो मिळाल्याबरोबर ती चांगली जळू लागून उत्तम प्रकाश पडतो. नंतर या ज्योतीखाली एक वाटी बमत जाते. तीत थोडे थोडे मेण वितळून ते एकसारखें वातीला पोंचते आणि त्यामुळे ती वात शेवटपर्यंत सारखी जळत राहते. मेण मळून किंवा पातळ मेणांत वात बुडवून अशा दोन्ही रीतींनी मेणबत्त्या करतात. दुसऱ्या रीतीने केलेल्या मेणबत्त्या ज्यास्त सुंदर व सफाईदार बनतात. ह्मणून हीच रीत ज्यास्त प्रचारांत आहे. प्राणिज मेणाच्या दिव्याची कृति मेणबत्त्यांच्या रूपाने साधली, तेव्हां त्याच कृतीने उद्भिज आणि खनिज तेलांत में एक मेणासारखें द्रव्य निघतें त्याच्याही मेणबत्या करूं लागले. या मेणांचे पुढील काही निरनिराळे प्रकार आहेत. उद्भिजांचे-(१ ) झाडांचा चीक-उदा०-राळ. ( २ ) स्टीरीन-हें खोबरेल व दुसरी घट्ट होणारी तेले यांपासून करतात. हा पदार्थ चरबीतून ही काढतात. खनिजांचें-यांत पाराफीन श्रेष्ठ आहे. हेही मेणासारखेच एक द्रव्य आहे. हे दगडी कोळशांच्या खाणीत सापडते. पूर्वी आपल्या देशांत मधमाशांच्या मेणापासून मेणबत्त्या करीत