पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वें. १२७ (३) बाळंतिणीच्या खोलीत आणि लिहिता-वाचतांना बिनचिमणीचा खुला दिवा ठेवू नये. (४) लहान मुलांच्या जवळ आणि त्यांचा हात पुरेल अशा रीतीने हा दिवा ठेवू नये. त्या योगाने त्यांच्या दृष्टीला अपाय होतो, आणि एखादे वेळी त्यांनी तो ओढून घेतल्यास किंवा पाडल्यास कपडे पेटण्याची व अंग भाजण्याची भीति असते. (५) लहान व कोंदट हवेच्या खोलीत मोठ्या ज्योतीचा दिवा लावून ठेवू नये. कारण, त्याने हवा दूषित होते. ठेवणे झाल्यास निदान ज्योत लहान करून ठेवावा. प्राणिज तेलें. प्राणिज तेलांचे दिवे घरोघरी करता येणे शक्य नाही, अर्थात् त्यांची तेल-वात कशी करावयाची ते सांगावयाला नको. पण हे दिवे कसे असतात, याविषयींची थोडीशी त्रोटक माहिती दिली असतां ती अस्थानी होणार नाही. प्राणिज तेलांत मधमाशांनी केलेले मेण, चरबी, कांहीं माशांचें तेल, बगैरेंचा समावेश होतो. मेण, चरबी व प्राण्याच्या शरीरापासून निघालेले तेल ही सगळी मधासारखी दाट असतात, व ती स्वतः घट्ट होतात किंवा कृतीने घट्ट करतां येतात. ही एकसारखींच असल्यामुळे सोईसाठी यांना एकच मेण हे नांव आपण देऊ. मेणबत्ती-वर लिहिलेल्या मेणांच्या तीन प्रकारांपैकी एकही प्रकार एकदम पेट घेणारा नाही. वातीशिवाय नुसते पेटविले असतां तें ज्योत धरीत नाही. त्याचा घट्ट गोळा वातीस लावून नुसता ठेविला आणि वात पेटविली तर वातीची ज्योत त्या गोळ्यास सारखी लागणार नाही, आणि अर्थात्च ज्योत लवकर विझेल. ह्मणून मेण